माय महाराष्ट्र न्यूज :देशात लवकरच नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) लागू होणार आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून हा कायदा देशभरात लागू होऊ शकता असा दावा
माध्यामातून केला जात आहे. लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता जारी होण्यापूर्वी गृह मंत्रालयाला हा कायदा लागू करायचा आहे. या कायद्यानुसार अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेशातून
भारतात आलेल्या अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व दिले जाणार आहे.दरम्यान यापूर्वीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) लागू करण्याविषयी सुतोवाच केले होते.
सीएएचे नियम आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी जारी केले जातील. लाभार्थ्यांना भारतीय नागरिकत्व देण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होईल, असे गृहमंत्री अमित शाह म्हणाले होते.रिपोर्टनुसार, CAA
साठीचे सर्व नियम तयार करण्यात आलेत. नोंदणीसाठी ऑनलाइन पोर्टलदेखील तयार करण्यात आले आहे. ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन असेल आणि अर्जदार त्यांचा मोबाईल फोनवरून नागरिकत्वासाठी
अर्ज करू शकणार आहे. अर्जदारांनी भारतात प्रवेश केल्याचे वर्ष नमूद करणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे यासाठी अर्जदारांकडून कोणतीही कागदपत्रे मागितली जाणार नसल्याचं म्हटलं जात आहे.
CAA अंतर्गत केंद्रातील मोदी सरकार बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील छळामुळे भारत आलेल्या गैर मुस्लिम स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व मिळणार आहे. ३१ डिसेंबर २०१४ पूर्वी भारतात
आलेले हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारशी आणि ख्रिश्चन यांना नागरित्व मिळणार आहे.डिसेंबर २०१९ मध्ये CAA संसदेत मंजूर झाला होता. या कायद्याला राष्ट्रपतींची संमतीदेखील मिळाली होती. पण देशाच्या अनेक
भागांमध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शने झाली होती. ४ डिसेंबर २०१९ रोजी संसदेत विधेयक मांडले गेले तेव्हा आसाममध्ये पहिल्यांदा निदर्शने सुरू झाली. यानंतर ही निदर्शने दिल्लीसह मोठ्या शहरांमध्ये पसरले. निदर्शनांमुळे
२७ मृत्यू झाले, त्यापैकी २२ एकट्या उत्तर प्रदेशात झालेत. एक हजाराहून अधिक लोकांना अटक करण्यात आली होती. आंदोलकांवर ३०० हून अधिक गुन्हे दाखल करण्यात आलेत. या सर्व विरोधामुळे हा कायदा लागू करण्यात उशीर झाला.