माय महाराष्ट्र न्यूज: मराठा अरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे यांचे एकेकाळचे सहकारी अजय बारस्कर महाराज यांनी अलीकडेच जरांगे यांच्या विरोधात भूमिका घेत त्यांच्यावर टीका केली.
त्यानंतर जरांगे यांच्याकडूनही बारस्कर यांच्यावर पलटवार करण्यात आला. राज्यभर बारस्कर यांचा निषेध सुरू झाला. त्यावेळी बारस्कर यांनी आपल्याला गावाची साथ असल्याचे वक्तव्य केल्याचे
सांगण्यात येते. त्यानंतर आता बारस्कर यांच्या सावेडी (ता. नगर) या गावाने स्पष्ट भूमिका घेतली आहे. गावाने ठरावून करून आपण बारस्कर यांच्यासोबत नव्हे तर जरांगे यांच्यासोबत असल्याचे म्हटले आहे.
पत्रकार परिषद घेऊन ही भूमिका मांडणात आलीच, सोबतच गावात ठिकठिकाणी तसे फलकही लावण्यात आले आहेत. एवढेच नव्हे तर सकाल मराठा समाजाने केलेल्या तक्रारीनंतर शेजारच्या बोल्हेगाव येथील
चौकात बारस्कर यांनी केलेले अतिक्रमण आणि महापुरुषाचा पुतळाही काढून टाकण्यात आला आहे.मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोप करणारे बारस्कर नगरच्या सावेडी गाव परिसरात राहतात. जरांगे पाटील
यांच्या पाठिशी सावेडी गावातील मराठा बांधव भक्कमपणे उभे असल्याचा एकमताने ठराव करण्यात आला आहे. नगर शहरातील सावेडी गावठाण परिसरातील ग्रामस्थांनी बैठक घेऊन मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोप करणाऱ्या अजय बारस्कर
यांचा सर्वानुमते सावेडी गावाच्या वतीने निषेध करण्यात आला. यावेळी माजी महापौर बाबासाहेब वाकळे, माजी नगरसेवक कुमार वाकळे, रवींद्र बारस्कर, बबन बारस्कर, राजेंद्र वाकळे, यशदेव बारस्कर,
सरेश करपे, राजेंद्र काळे, रवींद्र वाकळे, सचिन बारस्कर, नितीन बारस्कर आदी उपस्थित होते. तसेच त्याच्या वक्तव्याला सावेडी ग्रामस्थांचे अजिबात समर्थन नाही, असा एकमताने निर्णय घेण्यात आला.