नेवासा/प्रतिनिधी:महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय साखर कामगार फेडरेशनच्या वतीने राज्यातील साखर उद्योग व जोडधंद्यातील कामगारांच्या विविध मागण्यांचे निवेदन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना देण्यात आले.
महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय साखर कामगार फेडरेशनचे अध्यक्ष अविनाश आदिक व सरचिटणीस नितिन पवार यांचे नेतृत्वाखालील साखर कामगार संघटनेच्या शिष्टमंडळाने बुधवार दि.१३ मार्च रोजी
मुंबई येथील देवगिरी शासकीय निवासस्थानी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेऊन राज्यातील साखर कामगारांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली.यात प्रामुख्याने राज्यातील
साखर उद्योग व जोडधंद्यातील कामगारांच्या कराराची मुदत दि. ३१ मार्च २०२४ रोजी संपत आहे. त्यामुळे दि.०१ एप्रिल २०२४ पासून राज्यातील साखर उद्योगातील व जोड धंद्यातील कामगारांच्या नवीन वेतनवाढ
देणे कामी व सेवाशर्तीत बदल करण्याचे दृष्टिने राज्य शासन प्रतिनिधी, साखर कारखाने प्रतिनिधी व कामगार संघटनांचे प्रतिनिधी यांचा समावेश असलेली त्रिपक्षीय समिती लवकरात लवकर गठीत करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.
फेडरेशनचे संपर्कप्रमुख सुखदेव फुलारी, संभाजीराव माळवदे, संजय राऊत, आप्पासाहेब शिंदे,अशोक भराट , बबनराव लवांडे, अशोक थिटे,अंकुश जगताप,देविदास म्हस्के, संदीप ब्लफे यांचा या शिष्टमंडळात समावेश आहे.