Sunday, December 22, 2024

लंकेंनी चुकीची भूमिका घेऊ नये, घेतलीच तर त्यांची आमदारकी…. , अजितदादांचा गर्भित इशारा

WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके हे अजित पवारांना सोडून शरद पवार गटाची साथ देणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

लवकरच ते शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करण्याच्या चर्चा आहेत. त्यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. निलेश लंकेंनी चुकीची भूमिका घेऊ नये, घेतलीच तर त्यांचा आमदारकी जाणार

असा सज्जड दमच अजित पवारांनी दिला. शरद पवारांसोबत जायचं असेल तर लंकेंना आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल असंही ते म्हणाले. अजित पवारांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना हे वक्तव्य केलं.

लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी पारनेरचे आमदार निलेश लंके हे शरद पवार गटासोबत जाणार असल्याच्या चर्चा आहेत. त्यावर या आधीही अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली होती. निलेश लंके

असं काही करणार नाहीत असं ते म्हणाले होते. त्यानंतर बुधवारी आमदार निलेश लंके यांनी अजित पवार यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.अजित पवार यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतरही

निलेश लंके शरद पवार गटात जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. शरद पवारांच्या उपस्थितीत ते पक्षप्रवेश करणार असून त्यांना अहमदनगर दक्षिणमधून सुजय विखेंच्या विरोधात उतरवलं

जाणार असल्याच्या चर्चा आहेत.आमदार निलेश लंके यांनी चुकीची भूमिका घेऊ नये, आणि घेतलीच तर त्यांची आमदारकी जाणार असं अजित पवार म्हणाले. पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली

तर पक्षांतरबंदी कायद्यान्वये आमदारकी जाते असं अजित पवार म्हणाले.निलेश लंके यांनी जर शरद पवारांची साथ द्यायचं ठरलं तर त्यांना आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा

व्हिप सर्वाना लागू आहे, त्यामुळे पक्षविरोधी भूमिका घेतली तर त्यांची आमदारकी जाणार असा इशाराच अजित पवारांनी दिला. त्यामुळे निलेश लंके आता काय करणार हे पाहावं लागेल.

निलेश लंके हे त्या ठिकाणच्या स्थानिक राजकारणावर नाराज असल्याची माहिती असून आपण त्यामध्ये लक्ष घालणार असल्याचंही ते अजित पवार म्हणाले.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!