नेवासा
नेवासा तालुक्यातील भानसहिवरे येथील लोकनेते गोपिनाथ मुंढे प्रतिष्ठाणच्या कार्यकर्त्यांकडून पंकजा मुंढे यांना ५ लाख रूपयांचा धनादेश निवडणूक खर्चासाठी देण्यात आला आहे.
भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांना बीड लोकसभा मतदार संघातून भारतीय जनता पार्टीकडून लोकसभेची उमेदवारी मिळाल्याने नेवासा तालुक्यातील भानसहिवरे येथील गोपिनाथ मुंढे प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक निधी दिला. दि.२२ मार्च रोजी पंकजा मुंडे या नगर येथे आल्या असता माजी आमदार शिवाजीराव कार्डिले यांचे निवासस्थानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र किर्तन यांनी त्यांची भेट घेऊन ५ लाख रूपयांचा धनादेश त्यांचे कडे सुपुर्द केला.तसेच प्रतिष्ठानचे ५१ कार्यकर्ते स्वखर्चाने प्रचरासाठी बिडला येतील अशी ग्वाही दिली.खासदार डॉ.सुजय विखे,आमदार मोनिका राजळे,माजी आमदार शिवाजीराव कर्डिले आदि यावेळी उपस्थित होते.
*चेक वटवनार नाही पण आशीर्वाद म्हणून घेते…
या विषयी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, पाच वर्षात आम्ही काय काय अडचणीला सामोरे गेलो हे लोकांना न सांगता ही कळत असेल.कार्यकर्त्यांशी एक नात निर्माण झालेल आहे.हा चेक मी वटवेल की नाही पण तो मी त्यांच्या आशीर्वाद म्हणून घेत आहे.जीएसटीची धाड़ पडली त्यावेळी असेच कार्यकर्त्यांनी जवळपास १२ कोटी काही लाखांचे चेक जमा केले होते पण मी ते घेतले नाही.त्या प्रत्येक अंकात प्रेम आहे.प्रेम मी नक्की घेते कारण तो माझा हक्क आहे.