Thursday, February 12, 2026

नगरमध्ये भाजप इच्छुकांच्या मुलाखती सुरु असतानाच मोठा राडा या मतदारसंघातील दोन गटातील वाद समोर 

Screenshot 2026-01-05 095857
Screenshot 2026-01-05 095857
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. विधानसभा निवडणुका जवळ येत असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे.

अनेक पक्षांकडून सध्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत. त्यातच आता पाथर्डी शेवगाव मतदारसंघासाठी भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असताना गोंधळ उडाल्याचा प्रकार घडला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतशी प्रत्येक मतदारसंघातून इच्छुकांची संख्या वाढताना दिसून येत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी-शेवगाव मतदारसंघात देखील जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे. त्यातच आता इच्छुक

उमेदवारांच्या मुलाखती सुरू असताना गोंधळ उडाल्याने भाजपच्या दोन गटांमधील अंतर्गत कलह समोर आला आहे.काल पाथर्डी शेवगाव मतदारसंघासाठी भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येत होत्या. नाशिकचे प्रभारी आणि अहमदनगर जिल्ह्याचे निवडणूक निरीक्षक म्हणून

विजय साने हे या मुलाखती घेत होते. यावेळी विद्यमान आमदार मोनिका राजळे पक्षपाती करत असल्याचा आरोप भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला. इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीत खोटे पदाधिकारी दाखवून मत नोंदणीचा प्रयत्न केल्याने दोन गटात चांगलाच वाद उडाल्याचे दिसून आले. तर काही पदाधिकाऱ्यांना

मुलाखतीबाबत कळवण्यातच आले नसल्याचे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मुलाखती सुरू असताना गोंधळ झाल्याने काही काळ विजय साने यांनी कामकाज थांबवले होते. या गोंधळामुळे भाजपच्या दोन गटांमधील अंतर्गत कलह बाहेर आला आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!