नेवासा
नेवासा तालुक्यातील भेंडा खुर्दच्या माजी सरपंच व दक्षिण मुखी मारुती पाणी वापर संस्थेच्या संचालिका सौ. पुष्पाताई बाळासाहेब नवले यांना राज्यपालांच्या हस्ते महाराष्ट्र शासनाचा २०२०चा जिजामाता कृषिभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार पाणी वापर संस्थेचे वतीने सत्कार करण्यात आला.
संचालक अशोकराव मिसाळ,अध्यक्ष बापुसाहेब भागवत, सचिव सुखदेव फुलारी व कालवा निरीक्षक श्रीकांत करंजे ,भागवत दाभाडे आदी यावेळी उपस्थित होते.