Friday, January 3, 2025

गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ सानुग्रह अनुदान योजना

WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
previous arrow
next arrow
Shadow

अहिल्यानगर/सुखदेव फुलारी

 महाराष्ट्र राज्यामध्ये साखर उद्योग हा एक प्रमुख उद्योग असून सद्यःस्थितीमध्ये २५६ साखर कारखान्यांमध्ये अंदाजे ८ ते १० लाख ऊसतोड कामगार या क्षेत्रात काम करतात. या ऊसतोड कामगारांकरिता।महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ सानुग्रह अनुदान योजना आणली आहे.
या योजने अंतर्गत ऊसतोड कामगारांचे आपघाताने आग लागून झोपड़ी आणि सामग्रीचे नुकसान,वैयक्तिक अपघात (मृत्यु), वैयक्तिक अपघात (अपंगत्व),वैयक्तिक अपघात वैद्यकीय खर्च,बैलजोडी लहान-मृत्यू/अपंगत्व,
या करिता १० हजार रुपये ते ५ लाख रुपये पर्यंतचे सानुग्रह अनुदान मिळणार आहे.

महाराष्ट्र राज्यामध्ये साखर उद्योग हा एक प्रमुख उद्योग असून सद्यःस्थितीमध्ये राज्यात कार्यरत सुमारे १२७ सहकारी क्षेत्रातील व १२९ खाजगी क्षेत्रातील
असे एकूण २५६ साखर कारखान्यांमध्ये अंदाजे ८ ते १० लाख ऊसतोड कामगार या क्षेत्रात काम करतात. बहुतांश ऊसतोड कामगार है मराठवाडा विभागातील व विशेषतः बीड तसेच अहमदनगर, जालना, नांदेड, परभणी, धाराशिव, लातूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, जळगाव या जिल्हयांतील असून राज्यातील विविध जिल्ह्यांतील साखर कारखान्यांच्या परिसरातील ऊस शेती-फडावर स्थलांतरीत होऊन काम करतात. ऊस तोडणी व वाहतूक करताना होणारे अपघात, सर्पदंश, विजेचा शॉक, नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात तसेच अन्य कोणत्याही कारणांमुळे होणारे अपघात यामुळे या ऊसतोड कामगार, वाहतूक कामगार व मुकादम यांचा मृत्यू ओढवतो किंवा काहींना अपंगत्व येते. घरातील कर्त्या व्यक्तीस झालेल्या अपघातामुळे कुटूंबाचे उत्पन्न बंद होऊन अडचणीची परिस्थिती निर्माण होते. अशा अपघातात ऊसतोड कामगार, वाहतूक कामगार व मुकादमास व त्यांच्या कुटूंबास आर्थिक लाभ देण्याकरिता गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळामार्फत राज्यातील ऊसतोड कामगार, वाहतूक कामगार व मुकादम, त्यांचे झोपडी व बैलजोडी यांच्याकरीता अपघात विमा योजना तसेच त्यांचे झोपडी व बैलजोडी यांच्याकरीता विमा संरक्षण योजना राबविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. मात्र दिनांक ४ ऑक्टोबर, २०२४ रोजी मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीमध्ये सदर विषयाबाबत सविस्तर चर्चा होवून राज्यातील ऊसतोड कामगार, वाहतूक कामगार व मुकादम त्यांचे झोपडी व बैलजोडी यांच्याकरीता “गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ सानुग्रह अनुदान योजना” राबविण्याबाबत निर्णय झाला आहे.

“गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ सानुग्रह अनुदान योजना या योजने अंतर्गत आग लागून झोपड़ी व संसार उपयोगी सामग्रीचे नुकसान झाल्यास १० हजार रुपये,वैयक्तिक अपघातात मृत्यु झाल्यास
५ लाख रुपये, वैयक्तिक अपघातात अपंगत्व आल्यास २.५ लाख रुपये,
वैयक्तिक अपघात वैद्यकीय खर्च ५० हजार रुपये, लहान बैलजोडी मृत्यू/अपंगत्व आल्यास ७५ हजार रुपये,
मोठी बैलजोडी मृत्यू/अपंगत्य आल्यास १ लाख रुपये या प्रमाणे सानुग्रह अनुदानाची रक्कम देण्याची तरतूद करण्यात आली आहे.
ही योजना ऊस गाळप हंगामाच्या कालावधीसाठी लागू राहील. या कालावधीत ऊसतोड कामगार, वाहतूक कामगार व मुकादम यांना किंवा त्यांच्या बैलांना केव्हाही अपघातामुळे मृत्यू झाला किवा अपघातामुळे अपंगत्व आले तरीही ते या योजनेंतर्गत लाभासाठी पात्र राहतील.
या योजनेच्या लाभास पात्र असणाऱ्या ऊसतोड कामगार, वाहतूक कामगार व मुकादम यांनी अथवा त्यांच्या वारसदाराने शासनाच्या अन्य विभागांकडून अपघातग्रस्तांसाठी कार्यान्वित असलेल्या योजनेचा लाभ घेतला असल्यास सदर लाभार्थी “गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ सानुग्रह अनुदान योजना” या योजनेंतर्गत लाभास पात्र ठरणार नाही.

*कोणत्या अपघाताचा समावेश असेल…*

सदर योजनेअंतर्गत पात्रतेसाठी रस्ता / रेल्वे अपघात, पाण्यात बुडून मृत्यू, जंतुनाशके हाताळतांना अथवा अन्य कारणांमुळे विषबाधा , विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात, वीज पडून मृत्यू, उंचावरून पडून झालेला अपघात, सर्पदंश व विद्युदंश, जनावरांच्या हल्ल्यामुळे / चावण्यामुळे जखमी / मृत्यू, बाळंतपणातील मृत्यु, दंगल, अन्य कोणतेही अपघात इ. अपघातांचा समावेश असेल.

*कोणत्या बाबीचा समावेश नसेल…*

नैसर्गिक मृत्यु, योजना अंमलबजावणी पूर्वीचे अपंगत्व, आत्महत्येचा प्रयत्न, आत्महत्या किंवा जाणीवपूर्वक स्वत:ला जखमी करुन घेणे, गुन्हयाच्या उद्देशाने कायद्याचे उल्लंघन करतांना झालेला अपघात, अंमली पदार्थाच्या अंमलाखाली असतांना झालेला अपघात, भ्रमिष्टपणा, शरीरातर्गत रक्तस्त्राव, बैलगाडयांची / मोटार शर्यतीतील अपघात, युध्द, सैन्यातील नोकरी, जवळच्या लाभधारकाकडून खून या बाबींचा समावेश असणार नाही.

*पात्रते साठी लागनारी कागदपत्रे…

गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ सानुग्रह अनुदान योजनेचे लाभ प्राप्त होण्यासाठी अर्जासोबत
१) ग्रामसेवक यांच्याकडील ऊसतोड कामगार असल्याबाबत ओळखपत्र अथवा प्रमाणपत्र.२) मृत्यूचा दाखला ३) ऊसतोड कामगाराचे वारस म्हणून गाव कामगार तलाठ्याकडील गाव नमुना नं. ६. क नुसार मंजूर झालेली वारसाबी नोंद. ४) ऊसतोड कामगाराच्या वयाची पडताळणी करीता शाळा सोडल्याचा दाखला / आधारकार्ड/ निवडणूक ओळखपत्र, ज्या कागदपत्रांच्या आधारे वयाची ओळख खात्री होईल अशी कोणतीही कागदपत्रे.५) प्रथम माहिती अहवाल / स्थळ पंचनामा / पोलीस पाटील माहिती अहवाल ६) झोपडी आणि सामुग्रीचे वस्तूंचे आग / दंगल/संप/वादळ महापूर इ. मुळे नुकसान झाल्यास नुकसानीचा फोटो, नुकसानीची यादी, पंचनामा आदी कागदपत्रे सादर करणे आवश्यक राहील

*अपघाताच्या स्वरुपानुसार प्रस्तावासोबत सादर करावयाची कागदपत्रे….

१) रस्ता/रेल्वे अपघात:– प्रथम माहिती अहवाल, स्थळ पंचनामा, इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्ट मॉर्टम अहवाल
२)पाण्यात बुडून मृत्यू:–प्रथम माहिती अहवाल / पोलीस पाटील अहवाल, स्थळ पंचनामा. इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्ट मॉर्टम अहवाल व अशा प्रकारच्या अपघातातील मृत व्यक्तीचे प्रेत न सापडल्यास ६ महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर कुटुंबातील सदस्याचे घोषणापत्र (Declaration) व अपघातग्रस्त खातेदाराचा बुडून मृत्यू झाल्याचे सक्षम प्राधिका-याचे तलाठी/ग्रामसेवक प्रमाणपत्र
३)विजेचा बसल्यामुळे धक्का बसून
झालेला अपघात:– प्रथम माहिती अहवाल / पोलीस पाटील अहवाल, स्थळ पंचनामा, इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्ट मोर्टम अहवाल
४) वीज पडून मृत्यू :– प्रथम माहिती अहवाल / पोलीस पाटील अहवाल, स्थळ पंचनामा, इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्ट मोर्टम अहवाल
५) ऊंचावरुन पडून झालेला अपघात:-प्रथम माहिती अहवाल / पोलीस पाटील अहवाल, स्थळ पंचनामा, इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्ट मोर्टम अहवाल
६) जंतुनाशके हाताळतांना अथवा अन्य कारणामुळे विषबाधा:- प्रथम माहिती अहवाल / पोलीस पाटील अहवाल, पोस्ट मॉर्टम अहवाल, व्हिसेरा रिपोर्ट, (रासायनिक विश्लेषण अहवाल)
७) सर्पदंश/जनावराने चावा घेणे/रेबीज/ कोणत्याही प्राण्याने जखमी केल्यामुळे
अपंगत्व येणे किंवा मृत्यु ओढावणे:-
उपलब्धतेनुसार प्रथम माहिती अहवाल, पोलीस पाटील अहवाल, इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्ट मॉर्टेम अहवाल, रासायनिक विश्लेषण अहवाल (Viscera Report), शव विच्छेदन अहवाल (P. M. Report) केल्यामुळे किंवा वैद्यकीय विश्लेषण अहवाल उपलब्ध होऊ शकत नसल्यास अशा प्रकरणी अपघातग्रस्ताच्या अपंगत्य अथवा मृत्यूबाबतचे इंडियन मेडिकल असोसिएशनचे मान्यताप्राप्त वैद्यकीय व्यावसायिकाने दिलेले प्रमाणपत्र, किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र/उपकेंद्र येथील सक्षम अधिका-याने दिलेले प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. श्वापदाने अपघातग्रस्ताचे शरीर ओढत नेल्यामुळे व खाऊन टाकल्यामुळे मृतदेह सापडत नसल्यास ६ महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर कुटुंबातील सदस्याचे घोषणापत्र (Declaration) व अपघातग्रस्त व्यक्ती श्वापदाच्या हल्ल्यामुळे मृत्यू पावली असे सक्षम प्राधिका-याचे (तलाठी/ग्रामसेवक) प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.)
८) दंगलीमध्ये अपंगत्व अथवा मृत्यू:–
प्रथम माहिती अहवाल, स्थळ पंचनामा, इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्ट मॉर्टम अहवाल
९) आगीमुळे अहवाल झालेला अपघात:–प्रथम माहिती अहवाल / पोलीस पाटील अहवाल, पोस्टमॉर्टम
अहवाल (जर अपघातग्रस्त ऊसतोड मजूराचे शरीर आगीत पूर्णपणे जळून भस्म झाले असेल तर अपघातग्रस्तांच्या कुटुंबियांचे घोषणापत्र (Declaration) व सक्षम प्राधिकाऱ्याचे (तलाठी/ग्रामसेवक) प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे)
१०) बाळंतपणातील मृत्यु:– बाळंतपणात मृत्यू झाला असल्याबाबत शासकीय आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी यांचे प्रतिस्वाक्षरीसह प्रमाणपत्र.
११) अन्य कोणतेही अपघात:— प्रथम माहिती अहवाल / पोलीस पाटील अहवाल, स्थळ पंचनामा, इन्क्वेस्ट पंचनामा, आणि सक्षम प्राधिका-याने अपघात पडून मृत्यू झाल्याचे / कायमच अपंगत्व आल्याचे दिलेल्या प्रमाणपत्राची साक्षांकित सत्य प्रत.
१२)रस्ता, रेल्वे अपघात/विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात/आगीमुळे झालेला अपघात/वीज पडल्याने/सर्पदंश झाल्यामुळे बैलास अपंगत्व आल्यास:–पशुवैद्यकीय प्राधिकरणाने जारी केलेले अपंगत्व प्रमाणपत्र, बैलाचा कानात टेंग असलेला फोटो (३ प्रती),
साखर कारखान्याच्या कृषी कार्यालयाचा अहवाल,पांजरपोळ गोशाळेत बैल जमा केल्याचे प्रमाणपत्र.
आणि वरील सर्व नमूद कारणांमुळे बैलांचा मृत्यू झाल्यास बैलाचा शिवविच्छेदन अहवाल,बैलाचा कानात टेंग असलेला फोटो (३ प्रती),साखर कारखान्याच्या कृषी कार्यालयाचा अहवाल.

वरील क्रमांक १ ते १२ मधील नमूद कारणांव्यतिरिक्त इतर काही कारणांमुळे मृत्यू/अपंगत्व आले असल्यास अशा विवक्षित प्रकरणात जिल्हा समितीने विभागीय समितीच्या सहमतीने निर्णय घ्यावा.जेव्हा ऊसतोड कामगार, वाहतूक कामगार व मुकादम तसेच त्यांची बैलजोडी यांच्या अपघाताचे प्रकरण निदर्शनास येईल तेव्हा संबंधित अपघातग्रस्त ऊसतोड कामगार, वाहतूक कामगार व मुकादम यांचे वारसदार यांनी सर्व निर्धारीत कागदपत्रासह परिपूर्ण प्रस्ताव संबंधित सहायक आयुक्त, समाज कल्याण यांच्याकडे ३० दिवसाच्या आत सादर करावा, यासाठी सामाजिक न्याय विभागाचे सर्व क्षेत्रिय अधिकारी/ कर्मचारी संबंधितांना मार्गदर्शन करतील.
अपघातग्रस्त ऊसतोड कामगार, वाहतूक कामगार व मुकादम यांच्याबाबत प्राथमिक माहिती प्राप्त झाल्यानंतर सखोल चौकशी करण्यासाठी संबंधित समाज कल्याण अधिकारी, पोलिस अधिकारी यांच्या पथकाने प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी करून त्याबाबतचा अहवाल घटना झाल्यापासून ८ दिवसांच्या आत सादर करतील.
संबंधित सहायक आयुक्त, समाज कल्याण यांनी प्राप्त झालेल्या प्रस्तावाची छाननी करून पात्र असलेले प्रस्ताव संबंधित जिल्हयाचे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या बैठकीमध्ये ३० दिवसाच्या आत सादर करण्यात यावेत. सदर समिती मार्फत मंजूर प्रस्ताव गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळास पाठविले जातील. त्यानुसार गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळ यांच्यामार्फत संबंधित अपघातग्रस्त ऊसतोड कामगार, वाहतूक कामगार व मुकादम यांच्या कुटुंबाच्या वारसदारांच्या बैंक खात्यात ECS द्वारे अनुदान वाटप करण्यात येईल. ११. गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाने साखर कारखान्यांकडून रु.१० प्रति टन प्रमाणे प्राप्त होणा-या निधीतून सदर खर्च करावा.

——————————-
*अनुदानासाठी मृत कामगाराचे वारसदार पुढील प्राधान्यक्रमाने पात्र असतील…

१) मृत कामगाराची पत्नी/पती
२ ) मृत कामगाराची अविवाहित मुलगी
३) मृत कामगाराची आई
४) मृत कामगाराचा मुलगा

५) मृत कामगाराचे वडील
६) मृत कामगाराची सून
७) अन्य कायदेशीर वारसदार
—————–
(पूर्वार्ध)

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!