माय महाराष्ट्र न्यूज:अवघ्या काही तासांमध्ये राज्याच्या निवडणुकांचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे, त्याआधी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे विधानसभेची जोरदार मोर्चेबांधणी
सुरु असतानाच नगर दक्षिणमध्ये निलेश लंके यांना मोठा धक्का बसला आहे. निलेश लंके यांचे विश्वासू सहकारी असलेल्या पारनेरच्या माजी नगराध्यक्षांनी खासदार निलेश लंकेंना आव्हान देत विधानसभा निवडणूक लढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर मतदार संघात खासदार निलेश लंके यांना घेरण्यासाठी कधी काळी त्यांचे निकटवर्ती असलेले पारनेर नगरपालिकेचे माजी नागराध्यक्ष विजय औटी यांनी लंकेंच्या विरोधातच दसरा मेळावा घेतला.
निलेश लंके हे खासदार झाल्यानंतर पारनेरची जागा रिक्त झाली आहे. अशातच आता पारनेर मतदार संघातून निलेश लंके यांच्या पत्नी रानी लंके विधानसभेच्या मैदानात उतरण्याची चर्चा आहे.त्यामुळे त्यांना शह देण्यासाठी औटी हे विधानसभेच्या
रिंगणात उतरले आहे. 2019 ला निलेश लंकें यांचे आम्ही एकमुखाने काम केले मात्र आमच्या सारख्या अनेकांची हेळसांड झाली आहे. त्यांच्या कोविड काळात आमचा देखील हातभार लागला मात्र ते हवेत गेल्याने ही निवडणूक अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस
पक्षाकडून लढण्याचे औटी यांनी संकेत दिले आहेत.दरम्यान, या मेळाव्या प्रसंगी रावनाच्या पुतळण्याचे दहनही करण्यात आले. कट्टर समर्थकाने आव्हान दिल्याने निलेश लंकेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे. निलेश लंके हे महाविकास आघाडीकडून
खासदार झाल्यानंतर त्यांच्यावर विधानसभेच्या रणनितीची मोठी जबाबदारी असणार आहे अशातच त्यांना त्यांच्याच मतदारसंघातून घेरण्यात आल्याने पारनेरची निवडणूक ही चुरशीची मानली जात आहे.