Thursday, February 12, 2026

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप:अखेर पाटलांचं ठरलं! आमदारकीचा राजीनामा; लवकरच भाजपातून पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

Screenshot 2026-01-05 095857
Screenshot 2026-01-05 095857
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वाटेवर असलेले भाजपचे विधानपरिषद आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती आहे.

रणजीतसिंह मोहिते पाटील हे माढा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असून त्यामुळेच त्यांनी विधानपरिषद आमदारकीचा राजीनामा दिल्याचे समजते.मात्र आमदारकीच्या राजीनाम्याबद्दल स्वत: रणजीतसिंह मोहिते पाटलांनी

अद्याप अधिकृतरित्या माहिती दिलेली नाही.लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटील कुटुंबाने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची साथ देण्याचा निर्णय घेतला होता. ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धैर्यशील

मोहिते पाटील यांनी माढ्यातून लोकसभा निवडणूक लढवली आणि जिंकलीही. मात्र विजयसिंह मोहितेंचे पुत्र रणजीतसिंह मोहिते हे अद्यापही भाजपमध्येच होते. असं असलं तरी लोकसभा निवडणुकीपासून ते भाजपच्या व्यासपीठावर जाणं टाळत होते. त्यामुळे ते लवकरच

भाजपला रामराम करतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. अखेर आता त्यांनी आपला राजकीय निर्णय घेत आमदारकीचा राजीनामा दिल्याची माहिती आहे.माढा विधानसभा मतदारसंघातून शरद

पवारांच्या राष्ट्रवादीतून लढण्यासाठी तब्बल सहा नेते इच्छुक असल्याचे समजते.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!