Friday, November 22, 2024

नगर जिल्ह्यातील भाजपाला सर्वात मोठा धक्का बसणार? भाजप व संघाचे एकनिष्ठ असलेले कुटुंब भाजपची साथ सोडणार?

WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपने पहिली उमेदवारी यादी जाहीर केल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या उमेदवारी यादीनंतर भाजपमधील अनेक जण नाराज झाले आहेत. हे नाराजी नाट्य कालपासून सुरू आहे.

अनेकांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तर काही जण पक्ष सोडण्यावर ठाम आहेत. अशामध्ये राहुरी विधानसभा मतदारसंघात शिवाजी कर्डीले यांना उमेदवारी दिल्यामुळे कदम परिवार नाराज झाला आहे.

कदम परिवाराने भाजपची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे.गेल्या अनेक वर्षांपासून भाजपात असलेला कदम परीवार तिकीट न मिळाल्याने नाराज झाला आहे. राहुरी विधानसभा मतदारसंघात शिवाजी कर्डीले यांना उमेदवारी जाहिर

झाल्याने भाजपाचे इच्छूक उमेदवार सत्यजित कदम आणि त्यांचे वडील माजी आमदार चंद्रशेखर कदम भाजपविरोधात बंडाचे निशाण फडकवण्याची शक्यता आहे. अनेकदा पक्षाचा आदेश मानून निवडणुकीतून माघार घेतली होती. मात्र आता कार्यकर्ते जे सांगतील त्यानुसार

निर्णय घेणार असल्याचे सत्यजित कदम यांनी सांगितले आहे.गेल्या अनेक दशकांपासून भाजप आणि संघाचे एकनिष्ठ असलेले माजी आमदार चंद्रशेखर कदम हे पुन्हा एकदा शिवाजी कर्डीलेंना उमेदवारी दिल्याने नाराज झाले आहेत. २०१९ ला

देखील चंद्रशेखर कदम यांनी आपला मुलगा सत्यजित यांच्यासाठी पक्षाकडे राहुरी विधानसभेची मागणी केली होती. मात्र पक्षाने त्यांना सबुरीचा सल्ला देत शिवाजी कर्डिले यांनी उमेदवारी दिली. या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या प्राजक्त तनपुरे यांच्याविरोधात

कर्डिले यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.आता देखील देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली मात्र पुन्हा एकदा भाजपने उमेदवारीची माळ कर्डिले यांच्या गळ्यात

टाकल्याने कदम पिता – पुत्र नाराज आहेत. कार्यकर्ते जो निर्णय घेतील त्या निर्णयासोबत आपण राहणार सांगितल्याने कदम हे भाजप विरोधात दंड थोपटण्याची शक्यता आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!