माय महाराष्ट्र न्यूज:नेवासा विधानसभा मतदारसंघात मोठी चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे. माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी अपक्ष व प्रहार जनशक्ती पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. 4 नोव्हेंबरला सर्व चित्र स्पष्ट होणार आहे.
परंतु कोणत्याही परिस्थितीत विधानसभा निवडणुक लढवायची असा निश्चय बाळासाहेब मुरकुटे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी तालुक्यात मतदारांच्या गाठीभेटी घेण्याची सुरूवात केली आहे.
नुकतीच नेवासा विधानसभा मतदारसंघातील चांदा जिल्हा परिषद गटातील कौठा, महालक्ष्मी हिवरे,चांदा,मका,पांचुदा तसेच बेलपिंपळगाव येथील नागरिकांच्या भेट घेतल्या व कार्यकर्त्यांची बैठक घेतल्या आहे या दौराला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मुरकुटेनी 2014 ला भारतीय जनता पार्टीकडून विधानसभा निवडणुक
लढवली होती व ते जिंकून आले त्या पाच वर्षात मतदारसंघात मोठा विकास कामाचा डोंगर उभा केला . यामध्ये रस्ते वीज पाणी तसेच सर्वसामान्यांचं अडीअडचणी सोडवल्या म्हणून मुरकुटे व तालुक्यातील जनता, कार्यकर्ते नेहमी मुरकुटे सोबत उभे राहतात.
माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांना माजी जिल्हा परिषद सदस्या आशाताई मुरकुटे यांनी तालुक्यातील महिलांचे संघटन केले आहे. त्याचा फायदा बाळासाहेब मुरकुटे यांना होणार.तसेच या निवडणुकीत आमदार बच्चु कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाची मोठी मदत होणार आहे.
उत्तर नगर जिल्ह्याचे प्रहारचे अध्यक्ष अभिजित पोटे यांनी चांगले काम केले आहे. बाळासाहेब मुरकुटे यांचे काम व प्रहारचे संघटन यामुळे मुरकुटे यंदा निवडणुकीत बाजी मारू शकतात.
[ युवा नेते विष्णू मुरकुटे उतरले मैदानात:
बाळासाहेब मुरकुटे यांचा प्रचार करण्यासाठी मुरकुटे यांचे सुपुत्र व युवा नेते विष्णू मुरकुटे हे मैदानात उतरले आहेत त्यांनी तालुक्यातील युवकांना सोबत घेऊन प्रचारात उडी घेतली आहे. काही वर्षांपासून युवा नेते विष्णू मुरकुटे तालुक्यात चांगले सक्रिय झाले आहे.
विविध सुख: दुःखात सहभागी होतात. तसेच युवकांचे प्रश्न सोडवत माजी आमदार बाळासाहेब मुरकुटेंना साथ देत या निवडणुकीत फायदा होणार आहे.]