Thursday, March 26, 2026

बाळासाहेब मुरकुटे कोणत्या परिस्थितीत विधानसभा लढवणार – युवा नेते विष्णू मुरकुटे अफवांवर विश्वास ठेवू नका केले आव्हान

Screenshot 2026-01-05 095857
WhatsApp Image 2026-03-19 at 11.11.21 AM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: नेवासा विधानसभा माजी आमदार बाळासाहेब पाटील कोणत्याही परिस्थितीत ही विधानसभा निवडणुक लढवणार आहे तालुक्यातील विरोधकांकडून सोशल मीडियावर जे काही अफवा पसरवून तालुक्यातील जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करत आहे . नेवासा विधानसभा आपण अपक्ष व प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून पुर्ण ताकदीने लढवून जिंकणार आहे असे विधान युवा नेते विष्णू मुरकुटे यांनी आज माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे.

विष्णू मुरकुटे पुढे बोलताना म्हणाले की तालुक्यातील माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे विरोधकांकडून सोशल मीडियावर मुरकुटे निवडणूक लढवणार नाही असा अपप्रचार सुरू आहे.मुरकुटे यांना तालुक्यातील जनतेकडून मिळत असलेल्या पाठिंब्यामुळे विरोधकांची पाया खालची वाळू सरकली आहे. मागील आठवड्यात नेवासा फाटा येथे मेळावा घेण्यात आला त्यामध्ये तालुक्यातील सर्व कार्यकर्ते व नागरिकांनी सांगितले आहे की आपण ही निवडणूक लढवा आम्ही पुर्ण ताकदीने आपल्या सोबत आहे. ही निवडणूक लढवा असे तालुक्यातील सर्व सामान्य व्यक्तीने आग्रह केला यामुळे हा निर्णय घेतला आहे.

तालुक्यातील विरोधकांकडून निवडणूक जशी जाहीर झाली तशी मुरकुटे यांना तिकीट मिळू नये म्हणून प्रयत्न केले.परंतु मतदारसंघांतील यामागे विकास कामाचा डोंगर उभा केला. तसेच सर्व सुख दुःखात नेहमी उभा रहिले आहे.म्हणून जनतेच्या पाठिंबा मिळत आहे.त्याच पाठिंब्यावर आपण ही विधानसभा कोणत्याही परिस्थितीत लढवणार आहे कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन युवा नेते विष्णू मुरकुटे यांनी केले आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!