नांदेड/प्रतिनिधी
समाजसेवा, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण विकासाच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या आदरणीय श्रीमती सुरजबाई मारोती जोगपेटे (मोरताडे) यांना Kalyanam Educare प्रस्तुत राज्यस्तरीय ‘उपक्रमशील आदर्श महिला पुरस्कार-२०२७’ जाहीर झाला आहे. त्यांच्या सामाजिक आणि विकासाभिमुख कार्याची दखल घेऊन त्यांची या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. मुंबई येथे आयोजित भव्य सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
सुरजबाई या शेकापूर ता. कंधार येथील रहिवाशी असून त्यांनी संस्कृती संवर्धन मंडळ सगरोळी या संस्थेअंतर्गत नाबार्ड बँक च्या च्या अर्थ सहाय्यातून इंडोजर्मन पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम या प्रकल्प वर नागदरवाडी ता. लोहा येथे १९९८ ते २००३ या कालावधीत महिला समाज सेविका या पदावर काम करून पाणलोट विकास पाणी आडवा पाणी जिरवा , महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना सक्षम करणे असे कार्य नागदरवाडी गावात प्रत्यक्ष राहून 5 वर्ष काम केले आहे . नागदरवाडी गावात पाणी नसल्यामुळे लोक गाव सोडून जायचे काम साठी स्थलांतर करायचे तिथे पाणलोट चे काम झाले असल्यामुळे गावातील पाण्याची पातळी वाढली आहे आणि आता स्थलांतराचे प्रमाण कमी झाले आहे . सुरजबाई यांनी महिलांना सक्षम करण्यासाठी अनेकवेळा खूप मोठया संघर्षाला सामोरे जावे लागले . काही वेळेला हे कार्य करत असताना अपमान सहन करावा लागला पण त्यांनी हे हाती घेतलेले कार्य सोडले नाही .नागदरवाडी गावाच्या कार्याची संघर्षाची पाणी प्रश्न ची दखल अमीर खान प्रस्तूत सत्यमेव जयते कार्यक्रम मध्ये देखील घेतली गेली आहे .
संस्कृती संवर्धन मंडळ सगरोळी संस्थेचे संस्थापक चेअरमन कर्मयोगी बाबासाहेब तथा के. ना. देशमुख , संस्थेच्या समग्र ग्रामीण विकास प्रकल्पाचे तत्कालीन प्रकल्प संचालक प्रमोदजीं देशमुख , नाबार्ड बँकेचे जनरल मॅनेजर डॉ.वेंकटेश तगट , वॉटर संस्थेचे हरीश डावरे , वॉटरचे प्रशिक्षण अधिकारी बालाजीराव केंद्रे , नाबार्ड बँक, नांदेडचे तत्कालीन DDM अनिल जुवाटकर आदींच्या मार्गदर्शनाखाली सुरजबाई यांनी ग्रामविकास आणि महिला विकासाचे कार्य पार पाडले आहे .
सुरजबाई यांना नाबार्ड , वॉटर संस्था , बायफ अशा अनेक संस्थाचे सन्मान , पुरस्कार मिळाले आहेत . याच कार्याची दखल घेऊन पाणी प्रश्न साठी नागदरवाडी ता. लोहा येथे ज्यांनी काम केले ते बाबुराव केंद्रे यांच्या जीवनावर पाणी हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला आहे . या चित्रपट साठी प्रियांका चोप्रा यांनी अर्थसाहाय्य केले आहे तर दिग्दर्शक आणि अभिनेते म्हणून आदिनाथ कोठारे यांनी काम केले आहे. पाणी या चित्रपट मध्ये सुरजबाई यांच्या कार्याची दखल घेतली आहे . त्यांनी नागदरवाडी गाव साठी केलेले कार्य आणि केलेला संघर्ष याची दखल म्हणून त्यांच्या कार्याची नोंद पाणी या मराठी चित्रपट मध्ये झाली आहे . आणि आता हा पुरस्कार मिळाला आहे .संस्कृती संवर्धन मंडळ संस्थेअंतर्गत समग्र ग्रामीण विकास प्रकल्पात 21 वर्ष महिला समाज सेविका या पदावर राहून कार्य केले आहे . कंधार , धर्माबाद , नायगाव , लोहा , परळी आदी तालुक्यात संस्थेअंतर्गत नाबार्ड च्या विविध प्रकल्प वर कार्य केले आहे .
श्रीमती सुरजबाई जोगपेठे यांनी महिला समाजसेविका म्हणून सामाजिक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. समाजातील गरजू, वंचित आणि उपेक्षित घटकांच्या विकासासाठी संवेदनशीलतेने कार्य करण्याची त्यांची भूमिका उल्लेखनीय आहे. सामाजिक प्रश्नांकडे केवळ पाहण्यापेक्षा त्यावर विधायक पद्धतीने काम करण्याचा त्यांचा दृष्टिकोन त्यांच्या कार्यातून दिसून येतो.
नाबार्डशी संबंधित पाणलोट विकासाच्या कार्यात त्यांनी दिलेले योगदानही महत्त्वपूर्ण आहे. जलसंधारण, मृदसंधारण, नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन आणि ग्रामीण विकासाच्या दृष्टीने पाणलोट विकासाचे महत्त्व मोठे आहे. या क्षेत्रातील कार्यामुळे ग्रामीण भागाच्या शाश्वत विकासाला चालना मिळण्यास मदत होते.
महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रातही त्यांनी विशेष योगदान दिले आहे. महिलांना स्वावलंबनाची प्रेरणा देणे, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे आणि सामाजिक विकासाच्या प्रवाहात त्यांचा सहभाग वाढविणे या कार्याची दखल पुरस्कार निवडीत घेण्यात आली आहे.
त्यांच्या या निवडीमुळे सामाजिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. हा पुरस्कार त्यांच्या वैयक्तिक कर्तृत्वाचा गौरव करण्याबरोबरच ग्रामीण भागातील महिलांच्या सामाजिक योगदानाला मिळालेली प्रतिष्ठा मानली जात आहे.
त्यांच्या पुढील सामाजिक वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.


