Friday, February 13, 2026

“नेवासा विधानसभेचे चित्र उद्या स्पष्ट होणार;मुरकुटे-शेख माघार घेणार की लढणार याकडे तालुक्याचे लक्ष”

Screenshot 2026-01-05 095857
Screenshot 2026-01-05 095857
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/सुखदेव फुलारी

4 नोव्हेंबर ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असल्याने 221 नेवासा विधानसभा मतदारसंघाचे चित्र उद्या सोमवारी स्पष्ट होणार असून महायुतीत बंडखोरी करून उमेदवारी अर्ज भरलेले भाजपाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे व राष्ट्रवादीचे अब्दुल शेख हे उमेदवारी मार्ग मागे घेणार की निवडणूक लढणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून आहे.

नेवासा विधानसभेसाठी 24 उमेदवारांनी 33 अर्ज भरले होते त्यापैकी छाननीच्या दिवशी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचे भाजप व शिवसेनेकडून भरलेले उमेदवारी अर्ज एबी फार्म नसल्याने बाद झाले होते.
त्यामुळे शंकरराव यशवंतराव गडाख (शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे), विठ्ठलराव वकिलराव लंघे (शिवसेना), बाळासाहेब उर्फ दादासाहेब दामोधर मुरकुटे (प्रहार जनशक्ती) ,अब्दुल लालाभाई शेख (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी),पोपट रामभाऊ सरोदे (वंचित बहुजन आघाडी), शशिकांत भागवत मतकर (राष्ट्रीय समाज पक्ष), हरिभाऊ बहिरु चक्रनारायण (बहुजन समाज पार्टी), संतोष नानासाहेब काळे (अपक्ष),काबंळे ज्ञानदेव लक्ष्मण(अपक्ष), मुकुंद तुकाराम अभंग (अपक्ष),अजित बबनराव काळे (अपक्ष),ज्ञानदेव कारभारी पाडळे (अपक्ष),वसंत पुंजाहारी कांगुणे (अपक्ष)जगन्नाथ माधव कोरडे (अपक्ष),
सचिन प्रभाकर दरंदले (अपक्ष),,सचिन मदनलाल देसरडा (अपक्ष),ऋषिकेश वसंत शेटे (अपक्ष), रविराज तुकाराम गडाख (अपक्ष),गोरक्षनाथ पंढरीनाथ कापसे (अपक्ष),रामदास रावसाहेब चव्हाण (अपक्ष), शरद बाबुराव माघाडे (अपक्ष), सुनिता शंकरराव गडाख (अपक्ष)आशाताई दादासाहेब मुरकुटे (अपक्ष),रत्नमाला विठठलराव लंघे (अपक्ष) या उमेदवारांचे एकूण 31 उमेदवारी अर्ज शिल्लक आहेत. उद्या सोमवारी दिनांक चार रोजी कोण उमेदवार अर्ज मागे घेते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून आहे.

दरम्यान भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी बंडखोरी करत महायुतीला आव्हान दिलेले आहे. त्यांनी प्रहार जनशक्ति पक्षाकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून निवडणूक लढण्यावर ते ठाम आहेत तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे अब्दुल शेख यांनी महायुतीला घटक पक्ष असलेल्या अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आपल्यालाच अधिकृत उमेदवारी दिलेली आहे असा दावा केल्याने महायुतीतील पेच वाढलेला आहे. मुरकुटे व शेख यांनी उमेदवारी अर्ज मागे न घेतल्यास नेवासा तालुक्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उमेदवार शंकरराव गडाख, शिवसेनेचे विठ्ठलराव लंघे, प्रहार जनशक्तिचे बाळासाहेब मुरकुटे आणि राष्ट्रवादीचे अब्दुल शेख अशी चौरंगी लढत पहावयास मिळू शकते.
सोमवारी सकाळी १० ते दुपारी ३ यावेळेत केवळ पाचच तासात अर्ज माघारी घेता येणार आहे.त्यामुळे बंडखोरांचे मनधने करण्यासाठी केवळ एकच दिवस उरला आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!