नेवासा
नेवासा तालुक्यातील तरवडी येथील वृक्षमित्र शंकरराव कन्हेरकर यांना साईकला गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.
नेवासा तालुक्यातील तरवडी व परिसरात सामाजिक, आध्यात्मिक व पर्यावरण क्षेत्रात करीत असलेल्या कार्याची दखल घेऊन शिर्डी येथील ओम साई विकास प्रतिष्ठान व बीबीसी फिल्म प्रोडक्शनच्या वतीने श्री.कन्हेरकर यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. पुरस्कार वितरण समितीचे अध्यक्ष सुदाम संसारे यांनी कन्हेरकर यांना निवडीचे पत्र दिले.
शुक्रवार दि.९ जानेवारी रोजी शिर्डी येथील शांतीकमल सभागृहात प्रसिद्ध चित्रपट कलावंत व राजकीय मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे. हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल शंकरराव कन्हेरकर यांचे माजी मंत्री शंकरराव गडाख, माजी आमदार पांडुरंग अभंग यांच्यासह तालुक्यातील विविध सेवाभावी संस्था व ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.