नेवासा
नेवासा तालुक्यातील भानसहिवरे येथे।श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त जगद्गुरु संत तुकाराम महाराज व संत संताजी महाराज जगनाडे यांच्या मूर्तींची स्थापना व प्राणप्रतिष्ठा सोहळयाचे आयोजन
करण्यात आले आहे.
भानसहिवरे येथील जय संताजी महाराज प्रतिष्ठानाच्या वतीने या सोहळयाचे आयोजन करण्यात आले असून
दि.२४ ते दि २८ डिसेंबर या कालावधित महंत गुरुवर्य भास्करगिरी महाराज, उद्धव महाराज मंडलिक,वेदांताचार्य देवीदास महाराज म्हस्के , महंत सुनिलगिरी महाराज, रामेश्वर महाराज कंठाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा संपन्न होणार आहे .
या निमित्त दि. २६ रोजी श्रीसंत तुकाराम महाराज यांचे वंशज देहू संस्थानचे भानुदास महाराज मोरे यांचे किर्तनसेवेचे आयोजन करण्यात आले आहे .दि.२४ रोजी मूर्ती मिरवणूक व शोभा यात्रा,दि.२५ रोजी मूर्ती संस्कार , दि.२६ रोजी मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा , दि.२७ रोजी रामेश्वर महाराज कंठाळे यांचे संत जगनाडे महाराज यांच्या जीवन चरित्रावर संगीतमय कार्यक्रम व दि. २८ रोजी किर्तन सेवा संपन्न होणार आहे . भानसहिवरे येथील श्रीराम मंदिर प्रांगणात होणाऱ्या या मूर्ती स्थापना व प्रतिष्ठा सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त तेली समाज बांधव व ग्रामस्थ भानसहिवरे यांच्या वतीने करण्यात आले आहे .