नेवासा
नेवासा तालुक्यातील तरवडी येथील सत्यशोधक मुकुंदराव पाटील माध्यमिक विद्यालयात विविध कला गुणदर्शन कार्यक्रम संपन्न झाला.मुकुंदराव पाटील यांची कर्मभूमि असलेल्या तरवडी गावात तुमचा जन्म झाला तुम्ही भाग्यवान आहात असे प्रतिपादन नेवासा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांनी केले.
नेवासाचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांचे प्रमुख उपस्थितित शनिवार दि.२१ डिसेंबर रोजी विद्यालयामध्ये विद्यार्थी विविध कला गुणदर्शन कार्यक्रम संपन्न झाला,त्यावेळी विद्यार्थ्याना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
श्री.जाधव पुढे म्हणाले की, आज मी ३२ वर्ष पोलिस सेवेत आहे.माझी आई अशिक्षित असूनही मी आर्थिक परिस्थिती नसताना ही इथपर्यंत पोहचलो.
पदवीपर्यंत शिक्षण मी अतिशय खडतर परिस्थितीत पूर्ण करून आज तुमच्यासमोर उभा आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांनी आजच्या आधुनिक काळात व कलियुगात सर्वप्रथम स्वतःच्या करिअरकडे लक्ष द्यावे.
श्री.जाधव यांनी विद्यार्थ्यांमध्ये जाऊन त्यांच्या समवेत फोटो घेऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवला. मुकुंदराव पाटील आपले कार्य या खेड्या गावातून ते करू शकले तर आपण का करू शकणार नाही? असे सांगून त्यांनी विद्यार्थ्यांच्या
आत्मविश्वास वाढवला. पोलिस हे नागरिकांचे मित्र आहेत. तसेच
स्वसंरक्षणासाठी विद्यार्थिनींनी निर्भया व दामिनी पथकासाठी 112 नंबरवर संपर्क करावा असे आवाहन केले.
संस्थेचे सचिव उत्तमराव पाटील,राहुल जावळे, सचिन क्षिरसागर, कारभारी तुपे,शंकर कन्हेरकर, सातपुते गुरुजी, यशवंत पाटील, दत्तात्रय भारस्कर, मुख्याध्यापक सावता गायकवाड, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी,पालक, विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.