नेवासा
नेवासा तालुक्यातील गोंडेगाव-म्हसले या ग्रुप ग्रामपंचायतीचा अजब कारभार उघडकीस आला आहे. गेल्या बारा महिन्यापासून या ग्रामपंचायतचा कारभार ग्रामपंचायत सदस्य मासिक मिटिंगला उपस्थित नसतांना ही विना कोरम आणि विना प्रोसिडिंग कारभार चालू असल्याचे दर्शनास आली आहे. याबाबत सखोल चौकशी करून संबंधितावर कारवाई करावी अशी मागणी संतराम खंडू रोडगे यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे.
यबाबद श्री.रोडगे यांनी नेवासा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांचे कडे दाखल केलेल्या तक्रार अर्जात म्हंटले आहे की,दि.३० डिसेंबर रोजी
गोंडेगाव-म्हसले ग्रुप ग्रामपंचायतीची मासिक सभा होती, परंतु रोजी दि. ३० रोजी मागील मासिक सभेचे इतिवृत्त पाहणीसाठी मागीतले असता मागील जवळपास १२ महिन्यापासून मासिक सभेचे इतिवृत्त (प्रोसिडिंग) पुर्ण नाही. सभेच्या प्रोसिडिंग रजिस्टरवर केवळ एका किंवा दोन सदस्यांचे सहया व्यतिरिक्त कोणात्याही सदस्यांच्या स्वाक्षरी नाही. कोठेही सरपंच ग्रामसेवक यांची स्वाक्षरी नाही. पुर्णपणे मनमानी कारभार करत आहेत.
तरी यबाबद सखोल चौकशी करून संबंधितावर कारवाई करून ग्रामसेवकाचे यांचे तत्काळ निलंबन करावे, अन्यथा मी स्वतः दि.०७ जानेवारी २०२५ पासून पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
या तक्रारीच्या पुष्टीअर्थ श्री.रोडगे यांनी ग्रामपंचायत प्रोसिडिंग रजिस्टरच्या प्रती जोडल्या आहेत.