नेवासा
नेवासा तालुक्यातील कुकाणा मैत्रयी महिला मंडळाचे वतीने मकर संक्राती निमित्त आयोजित हळदी कुंकू समारंभात घेण्यात आलेल्या खेळ पैठणीचा कार्यक्रमात मीना क्षीरसागर या कुकाणा रणरागिणी तर उषा गायकवाड या सोन्याची नथीच्या तर कांचन पवार या पैठणीच्या मानकरी ठरल्या आहेत.
मंगळवार दि. ०४ फेब्रुवारी रोजी सांय ५ वाजता डॉ. कोलते हॉस्पिटलच्या प्रांगणात सरपंच लताताई अभंग, सुरेखा देशमुख,लीलाबाई चोधरी,डॉ.अंजली गाडगे,डॉ. रेश्मा बाफना,डॉ. पुजा भागवत, डॉ. प्रिती नांगरे, डॉ. सपना पवार,डॉ. जया गवळी,डॉ. दिपाली वाबळे,डॉ.मंगल गवळी यांचे प्रमुख उपस्थितीत हळदी कुंकूवाचा कार्यक्रम झाला. यावेळी खेळ पैठणीचा या कार्यक्रमात तालुक्यातील महिलांनी सहभाग घेतला होता.यावेळी कुकाणा रणरागिणी साठी पिठाची गिरणी तर खेळ पैठणीचा कार्यक्रमाकरिता प्रथम बक्षीस सोन्याची नथ,व्दितीय, तृतीय,चतुर्थ,पाचवे आणि
सहावे क्रमांकांसाठी पारितोषिक म्हणून
पैठणी देण्यात आल्या.
*यावेळी देण्यात आलेले बक्षीसे अशी…*
कुकाणा रणरागिणी ठरलेल्या सौ.मीना क्षिरसागर यांना पिठाची गिरणी बक्षीस म्हणून देण्यात आली.
प्रथम क्रमांक उषा गायकवाड (सोन्याची नथ),द्वितीय क्रमांक कांचन पवार (पैठणी),तृतीय क्रमांक.मंजुश्री वाघ पैठणी), चतुर्थ क्रमांक सविता मुनोत (पैठणी),पाचवा क्रमांक सुजाता गरड (पैठणी),सहावा क्रमांक सोनाली तुपे (पैठणी),विशेष उत्तेजनार्थ पारितोषिक
कामिनी वाघ व उषा पवार (चहा पावडर).
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी
मैत्रयी महिला मंडळाच्या अध्यक्षा डॉ. विद्या कोलते, लताताई अभंग,सुगंधा देशमुख,सुरेखा तुपे, सुनीता कचरे,अंजली क्षीरसागर,संगीता एरंडे, डॉ.मंगल गवळी,सविता मुनोत,कल्याणी खराडे, प्रीती नांगरे, संध्या गरड यांनी विशेष परिश्रम घेतले.
पारितोषिकांसाठी सचिन अॅटोमोबाईल्स,बागडे सराफ,विश्वंभर मोबाईल,लखन ग्राफिक्स,वसंत फर्निचर,एस.एस.कन्स्ट्रक्शन,स्वागत मोबाईल, किशोर भंडारी,ज्ञानेश्वर मोबाईल शॉपी यांनी सहकार्य केले.