नेवासा
नेवासा तालुक्यातील कुकाणा येथील राज्य मार्ग क्रमांक ५० वरील १५ मिटरच्या आतील अतिक्रमणे काढून घेण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने नोटिसा बजवल्याने कुकण्यातील व्यापाऱ्यांसह माजी आमदार पांडुरंग अभंग ही आक्रमक झाले असून अगोदर भुसंपादन ‘अवार्ड’ दाखवा मगच अतिक्रमणाला हात लावा अन्यथा रस्त्यावर उतरु असा इशारा माजी आ.पांडुरंग अभंग यांनी बांधकाम विभागाला दिला आहे.
राज्य महामार्ग क्रमांक ५० वरील कुकाणा येथील १५ मिटर पर्यंतचे अतिक्रमण काढून घेण्याच्या नोटिसा आल्याने अस्वस्थ झालेल्या अतिक्रमण बाधित व्यापाऱ्यांची श्री.अभंग यांचे उपस्थितित मंगळवार दि.११ रोजी सांयकाळी बैठक झाली,त्यावेळी ते बोलत होते.
श्री.अभंग पुढे म्हणाले की राज्यमार्ग क्रमांक ५० वरील कुकाणा येथील १५ मीटर पर्यंतची अतिक्रमणे काढून घेण्यासाठीच्या नोटिसा सार्वजनिक बांधकाम खात्याकडून बजवण्यात आलेल्या आहे. यापूर्वी ही अनेक वेळा बांधकाम खात्याने १० मीटर पर्यंतचे अतिक्रमने काढून गटार बांधलेली आहे. हा राज्य मार्ग होत असताना शासनाने रस्त्याचे मध्या पासून दोन्ही बाजूने दहा-दहा मीटर म्हणजे ६६ फुट जमीनेचे अवार्ड करून जमीन संपादित केलेली आहे. त्यामुळे रस्त्याचे मध्या पासून केवळ १० मीटर (३३ फुट) पर्यंतच बांधकाम विभागाची हद्द येते.
नवीन नियमानुसार राष्ट्रीय महामार्ग- राज्य महामार्ग १०० फुटाचे करण्यात येणार असे सांगितले जाते, त्यास कोणाची ही हरकत नाही. मात्र त्यासाठी लागणारी जमीन लागते त्या जमिनिचा मोबदला त्या त्या व्यक्तीला देऊन त्याजागेचे अवार्ड केले पाहिजे. व्यापाऱ्यांनी १० मिटरच्या आतिल सर्व अतिक्रमने स्वतः हून काढली आहेत. १० मीटरच्या बाहेर आमचे खाजगी क्षेत्र येते. सर्व दुकान १० मीटर अंतराच्या बाहेर असल्याने कोणी ही अतिक्रमण केलेले नाही. त्यामुळे रस्त्यासाठी लागनारी अतिरिक्त जमीन संपादित केल्याचे अवार्ड अगोदर आम्हाला दाखवा मगच अतिक्रमण काढा,तो पर्यंत दुकानांना हात लावू देणार नाही अशी स्पष्ट भूमिका श्री.अभंग यांनी घेतली आहे.यावेळी शरद गरड यांनी ही व्यापाऱ्यांची भूमिका मांडली.