अहिल्यानगर
दि. 8 फेब्रुवारी 2025 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच प्रदेशाध्यक्ष मनोज व्यवहारे यांच्या सूचनेनुसार आणि अहिल्यानगर पक्ष निरीक्षक प्रदीप हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली असंघटित कामगार संघटनेची आढावा बैठक अहिल्यानगर शासकीय विश्रामगृह येथे पार पडली.
या बैठकीचे आयोजन युवा नेते अब्दुल शेख तसेच अहिल्यानगर शहर जिल्हाध्यक्ष इम्तियाज सिकंदर शेख यांच्या नियोजनाखाली करण्यात आले. यावेळी शासकीय निवासस्थानी संघटनेचे अहिल्यानगर पक्ष निरीक्षक प्रदीप हांडे यांच्या उपस्थितीत विविध विषयांवर चर्चा झाली.
या बैठकीत असंघटित कामगारांच्या समस्या, संघटन मजबूत करण्याच्या उपाययोजना तसेच भविष्यातील कार्ययोजनांवर मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थित सदस्यांनी संघटनेसाठी सकारात्मक योगदान देण्याचा निर्धार व्यक्त केला.
कार्यक्रमास राष्ट्रवादीचे नेवासा तालुकाध्यक्ष अशोक मोरे ,उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष मकरंद राजहंस, शिर्डी लोकसभा अध्यक्ष अंबादास गायकवाड, पारनेर तालुका अध्यक्ष सुरेश जी वराळ, पाथर्डी तालुका अध्यक्ष फिरोज भाई पठाण, विलास देशमुख , प्रज्वल साबळे, विठ्ठल कवाद ,विशाल कवाद, अमोल तनपुरे, विकास काळे, वैभव पळसकर, रोहिदास लामखडे, वैभव थोरात, शैलेश उदावंत, राहुल रीसे, पवन फिरोदिया ,राजू तांबोळी ,गोरक्ष जाधव, जलाल शेख, आणि सचिन शिंदे , आदि पदाधिकारी उपस्थित होते.