Friday, March 28, 2025

पोक्सो मधील आरोपी केश्या पवारला 20 वर्षे सश्रम कारावास आणि 10 हजार रुपये दंडाची शिक्षा

WhatsApp Image 2025-01-30 at 3.26.50 PM
481894906_9460333617322859_6156576721810500656_n
previous arrow
next arrow
Shadow

अहिल्यानगर/प्रतिनिधी

डीवायएसपी संदीप मिटके यांच्या सखोल तपासाला यश आले असून राहुरी तालुक्यातील पोक्सो मधील आरोपी केश्या पवारला न्यायालयाने 20 वर्षे सश्रम कारावास आणि 10 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोटावली आहे.

याबाबद अधिक माहिती अशी की, राहुरी तालुक्यातील आरडगाव येथे मध्यमवर्गीय सर्वसाधारण कुटुंब राहत होते. दि. 18 जुन 2022 रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास त्यातील एक मुलगी आणि मुलगा आजारी असल्याने औषधोपचाराकरिता आई-वडील त्यांना घेऊन मांजरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गेले. दुपारी साडेबाराच्या सुमारास ते परत आले तर त्यांना त्यांच्या तीन मुली आणि शेजारी- पाजाऱ्यांचे मुले मुली घराशेजारी खेळत असताना दिसले परंतु त्यातील सर्वात पाच वर्षाची अबक मुलगी दिसली नाही त्यांची सर्वात मोठी मुलगी आई-वडिलांकडे पळत आली आणि त्यांना म्हणाली की,” केश्या आपल्या अबकला आंबे खाऊ घालतो” असे सांगून सोबत घेऊन नारळाच्या झाडांकडे गेला. त्यानंतर लागलीच आई-वडिलांनी वेगवेगळ्या ठिकाणी आवाज देत मुलीचा शोध सुरू केला. त्यावेळी बांधाजवळ अबक हिचा रडण्याचा आवाज ऐकून आई त्या दिशेने पळ सुटली समोरील दृश्य पाहून आईचा काळजाचा ठोकाच चुकला पाच वर्षाची चिमुकलीवर बलात्कार करून जीवे ठार मारण्याचे उद्देशाने आरोपी केश्या तिचा गळा आवळत होता. आई जोरात ओरडली “केश्या, सोड माझ्या मुलीला” आणि त्यांच्या दिशेने सुसाट पळत सुटून केश्याची गचंडी पकडली केश्या आईला लोटून देऊन पळून गेला ओरडण्याचा आवाज ऐकून तिचे वडील बांधाकडे आले आणि केश्याचा पाठलाग करू लागले परंतु केश्या त्यांच्या हाती लागला नाही. त्या चिमुकलीचे अंग चिखलाने माखले होते, बलात्कार केल्यानंतर जीवे ठार मारण्याचे उद्देशाने गळ्याभोवती कपड्याचा तुकडा गुंडाळला होता पीडिता ही अतिशय घाबरलेल्या अवस्थेत होती अशा परिस्थितीत त्यांनी राहुरी पोलीस स्टेशनला येऊन भा.द.वि. कलम ३६३,३७६ (अ), (बी) (आय) (जे), ३७६ (अ), ३०७,३,४ पोक्सो अॅक्ट तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणारा कायदा कलम ६ या अन्वये फिर्याद दिली. या गुन्ह्याचा प्राथमिक तपास पीएसआय सज्जनकुमार नारेडा यांनी केला गुन्ह्याचे गांभीर्य आणि संवेदनशीलता पाहून गुन्ह्याचा पुढील तपास डीवायएसपी संदीप मिटके यांच्याकडे वर्ग करण्यात आला त्यांनी सखोल तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

या खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे एकुण १७ साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये अल्पवयीन पिडीत मुलगी तसेच पिडीत मुलीची आई, बहीण, पंच साक्षीदार, तपासी अधिकारी, तसेच वयासंदर्भात आरोग्य सेवक नगरपरिषद देवळाली प्रवरा वैदयकीय अधिकारी राहुरी व अहमदनगर यांची साक्ष महत्वाची ठरली. या केसची सुनावणी चालु असताना सरकारी वकीलांनी युक्तीवाद केला की, पिडीत मुलगी ही घटनेच्या वेळी केवळ ५ वर्षे होती. अशा कमी वयामध्ये घडलेल्या घटनेमुळे बालमनावर अतिशय वाईट परिणाम होत असतो व त्याचे ओरखडे आयुष्यभर त्यांचे मनावर पडतात. आरोपीने अत्यंत वाईट पध्दतीने सदरची घटना केलेली आहे. तपासात आलेला संपूर्ण पुरावा ग्राहय धरून मा. श्रीमती माधुरी मोरे विशेष जिल्हा न्यायाधीश यांनी आरोपरीस अन्वये दोषी धरून *आरोपीस कलम ६ पोक्सो अन्वये २० वर्षे सक्त मजुरीची शिक्षा तसेच दंड रु.१०,०००/- दंड न भरल्यास दोन महिने साधी कैद, भा.द.वि. कलम ३६३ नुसार ३ वर्षे सक्त मजुरीची शिक्षा तसेच दंड रू.१,०००/- दंड न भरल्यास एक महिना साधी केंद, कलम ३०७ भा.द.वि. नुसार १० वर्षे सक्त मजुरीची शिक्षा तसेच दंड रू.१०,०००/- दंड न भरल्यास दोन महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली.* *सदर गुन्ह्य़ाचा प्राथमिक तपास पीएसआय सज्जनकुमार नारेडा यांनी केला, गुन्ह्याचे गांभीर्य आणि संवेदनशीलता पाहून गुन्ह्याचा पुढील तपास डीवायएसपी संदिप मिटके यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते .त्यांना मपोना अश्विनी पवार, विलास उकिरडे, रविंद्र माळी यांनी सहकार्य केले. सहायक सरकारी अभियोक्ता वैशाली राहुल राऊत यांनी सरकारी पक्षाची बाजू मांडली. पैरवी अधिकारी पो.कॉ. /१५११ आर.डी.आडसुळ आणि पो.कॉ./२५८२ योगेश वाघ , गणेश लिपने, रोहित पालवे यांनी सहकार्य केले.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!