नेवासा/सुखदेव फुलारी
महाराष्ट्र शासनाच्या यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनीच्या (यशदा) जलसाक्षरता केंद्र कडून दि. १६ ते २२ मार्च २०२५ या कालावधित जलजागृती सप्ताहानिमित्त ऑनलाइन जलसंवाद कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
या ऑनलाइन जलसंवाद कार्यशाळेत दररोज सायं. ५ वाजता तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन होणार आहे.
यात दि.१६ मार्च रोजी आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पदमश्री पोपटराव पवार (विषय-शाश्वत जलसमृध्द गाव- हिवरेबाजार), दि.१७ मार्च रोजी जलयोद्धा गोवर्धन कुलकर्णी,नाशिक(विषय-महाराष्ट्र सिंचन पध्दतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन अधिनियम-२००५ पाणी वापर संस्था),
दि.१८ मार्च रोजी जलनायक रमाकांतबापु कुलकर्णी (विषय-पाण्याचा ताळेबंद- जलअंदाजपत्रक व पीक नियोजन आराखडा),दि.१९ मार्च रोजी जलनायक उदयसिंह गायकवाड (विषय-चला जाणुया नदिला-नदी प्रदुषण समस्या व उपाय योजना),दि.२० मार्च रोजीभूजल सर्व्हेक्षण व विकास यंत्रणा,पुणे उपसंचालक श्रीमती भाग्यश्री मग्गीरवार (विषय-चला भूजल जाणुया -महाराष्ट्राची भूजल रचना व जलसाक्षरता), दि.२१ मार्च रोजी
बालभारतीचे माजी संचालक कृष्ण कुमार पाटील (विषय-जलसाक्षरतेमध्ये शालेय जलसाक्षरता महत्व व कृती कार्यक्रम),
दि.२२ मार्च रोजी जलपुरुष डॉ.राजेंद्रसिह राणा (विषय-जलसाक्षरता आणि शाश्वत विकास). या ऑनलाइन जलसंवाद कार्य शाळेत सहभागी होण्याचे आवाहन
यशदाचे उपमहासंचालक तथा संचालक (आरजीएसए) डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी व जलसाक्षरता केंद्राचे संचालक आनंद पुसावळे यांनी केले आहे.
*ऑनलाइन सहभागी होण्याकरिता खालील लिंकचा वापर करवा….
https://teams.microsoft.com/l/meetup-join/19%3ameeting_MzBhNDYwYjItNTA4NC00MjcwLWE3MjEtZTRiYjk2OGM0NjQ2%40thread.v2/0?context=%7b%22Tid%22%3a%220ee70540-947b-47f2-a594-c1ac583d6df1%22%2c%22Oid%22%3a%2274c56a31-f3fa-4b88-ba3d-b10962ce5852%22%7d