Tuesday, April 22, 2025

श्रीक्षेत्र गुहा येथे १८ ते २० मार्चदरम्यान कानिफनाथ महाराज यात्रा उत्सव कमिटीच्या अध्यक्षपदी अतुल कोळसे उपाध्यक्षपदी रवींद्र डौले तर खजिनदारपदी अनिल सौदागर

WhatsApp Image 2025-01-30 at 3.26.50 PM
481894906_9460333617322859_6156576721810500656_n
WhatsApp Image 2025-04-09 at 6.52.29 PM
previous arrow
next arrow
Shadow

गुहा प्रतिनिधी: राहुल कोळसे: अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील गुहा येथील कानिफनाथ महाराज यात्रा उत्सव बुधवारी १८ मार्च पासून प्रारंभ होऊन २० मार्च या कालावधीत हा यात्रा उत्सव संपन्न होणार आहे. यात्रा उत्सव समितीच्या अध्यक्षपदी अतुल दत्तात्रय कोळसे उपाध्यक्षपदी रवींद्र बाळासाहेब डौले तर खजिनदारपदी अनिल सौदागर यांची निवड करण्यात आली आहे. या यात्रा उत्सवासाठी नगर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात नाथ भक्त दर्शनासाठी येतात.

मंगळवार १८ मार्च रोजी मानाचा नैवद्य व काठी मिरवणूक, बुधवारी १९ मार्च रोजी सकाळी होमहवन, गंगाजल पूजन व कावड मिरवणूक त्यानंतर दुपारी महाआरती होईल सायंकाळी रात्री ८ ते ११ सांस्कृतिक कार्यक्रम, गुरुवारी २० मार्च रोजी दुपारी ३ ते ४ या वेळेत सराला बेटचे मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांचे प्रवचन व सायंकाळी ५ ते ६ या वेळेत भव्य कुस्ती हंगामा व त्यांनतर सायंकाळी महाआरती होऊन रात्री ८ वाजता नाथभक्त आकाश शिंदे यांचा नाथ गीतांचा कार्यक्रम होणार असून या निमित्ताने हिंदू धर्म रक्षक राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग उपस्थित राहणार आहेत.

भाविकांना दर्शन सहज शक्य होण्यासाठी दर्शन रांग मंदिर परिसरात विद्युत रोषणाई केली जात आहे. पार्किंग व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जात आहे तसेच यात्रा उत्सव कालावधीत विविध प्रकारचे दूकाने यामध्ये फुल हार ,खेळणी, खाद्यपदार्थ, सौंदर्य प्रसाधने, गृह उपयोगी साधने ,आदी दुकाने थाटली जात आहे.

यात्रा कमिटी पुढीलप्रमाणे:सह खजिनदार – अनिकेत दादासाहेब कोळसे,सचिव – मच्छिंद्र बाळासाहेब आंबेकर ,सहसचिव – अमोल सुरेश भांड ,कार्यक्रम व्यवस्थापक – सचिन बाबासाहेब लांबे,मंदिर व्यवस्थापन – साईनाथ सतीश पवार,सह मंदिर व्यवस्थापन – वैभव अण्णासाहेब लांबे,सदस्य – योगेश राऊत,गौरव वाघ, पोपट शिंदे, सागर काकडे, मंगेश काकडे, गौरव डौले , सागर खपके, सुनिल अशोक तारू, अजय बाळासाहेब मांजरे, वैभव संजय शिंदे, राहुल सुनील उर्हे, मुकेश मच्छिंद्र चंद्रे, अमुल कैलास कोळसे ,हर्षद कोळसे, शंकर वाबळे, अशोक कोळसे, रूपेश सौदागर, सचिन खपके, योगेश वर्पे, बाबू कुचेकर, संतोष खराडे, बाळासाहेब जगताप, शिंदे महेश बाळासाहेब, बाबासाहेब काकडे, रामा मदने, सागर लांबे, मंगेश गवांदे, संकेत कोळसे यांची निवड करण्यात आली.

काल शुक्रवारी श्रीफळ वाढवून यात्रेस प्रारंभ करण्यात आला.यावेळी सुजित वाबळे,अविनाश ओहोळ, नंदू सौदागर, नानासाहेब चंद्रे ,शरद कोळसे,शिवाजी मांजरे, शरद वाबळे,राम बर्डे,विजय वाबळे, चंद्रकांत थोरात,लहानु कोळसे, दत्तात्रय शिंदे,हरि आंबेकर अनिकेत गांगुर्डे आदि ग्रामस्थ उपस्थित होते.

सर्व कानिफनाथ भक्तांनी दर्शनाचा व यात्रा कालावधी मधील कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री कान्होबा उर्फ कानिफनाथ देवस्थान विश्वस्त कमिटी, यात्रा कमिटी व गुहा ग्रामस्थांनी केले आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!