नेवासा/सुखदेव फुलारी
महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाचे वतीने दि.१६ मार्च २०२५ ते २२ मार्च या कालावधीत आयोजित केलेल्या जल जागृती सप्ताह निमित्त पाणी वापर संस्था पदाधिकारी, शेतकरी, अधिकारी यांच्या करिता दररोज सकाळी ११. ते १२.३० यावेळेत ऑनलाइन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पाटबंधारे संशोधन व संचालनालय, पुणे अधीक्षक अभियंता श्रीमती. वैशाली नारकर व प्रशिक्षण समन्वयक प्रा. डॉ. गणेश बडे यांनी दिली.
दि.१७ मार्च रोजी गोदावरी मराठावाडा पाटबंधारे विकास महामंडळ, छ. सांभाजीनगर कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार यांचे हस्ते व तापी खोरे पाटबंधारे विकास महामंडळ, जळगाव कार्यकारी संचालक डॉ. प्रकाश पवार यांचे प्रमुख प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन होईल तर दि. २२ रोजी जलसंपदा विभागाचे सचिव डॉ. संजय बेलसरे व विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपुर कार्यकारी संचालक राजेश सोनटक्के यांचे प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
व्याख्याते व त्यांचे विषय असे…
दि.१७ सकाळी ११. ते १२.३०
लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता।समाधान सब्बीनवार (विषय-
सहभागी सिंचन व्यवस्थापन व पानी वापर संस्था यांच्या मध्ये जलसंपदा विभागाची भूमिका, अडचणी आणि संधी)
दि.१८ सकाळी ११. ते १२.३०
वाघड प्रकल्प संघाचे प्रथम अध्यक्ष शहाजी सोमवंशी (विषय-राज्यातील पानी वापर संस्था समोरील संधि आणि आव्हाने)
दि.१९/०३/२०२५ रोजी ११. ते १२.३०
गोसेखुर्द उजवा कालवा विभाग कार्यकारी अभियंता संदीप हासे (विषय-सचिव – पाणी वापर संस्था यांच्या प्रशासकीय कामकाजातील महत्वाचा कणा)
दि.२० रोजी ११. ते १२.३० MWRRA निवृत सचिव डॉ. सुरेश कुलकर्णी।(विषय-सिंचन क्षेत्रात आधुनिकीकरण करणे म्हणजे नेमके काय?)
दि.२१ रोजी सकाळी ११ ते १२.३०
प्रभू फाउंडेशनचे राहुल गुलहाने (विषय-
नालेश्वर प्रकल्पवरील पानी वापर संस्थांची यशोगाथा)
दि.२२ मार्च रोजी सकाळी ११. ते १२.३० सचिव,जलसंपदा विभाग,मंत्रालय महाराष्ट्र राज्य, मुंबई डॉ. संजय बेलसरे
(विषय-चला आपण आपली पानी वापर संस्था सक्षम करू या).
राज्यातील पाणी वापर संस्था पदाधिकारी, शेतकरी व अधिकारी अधिकारी यांनी गुगल मिट व्दारे होणाऱ्या या ऑनलाइन शाळेत सहभागी होण्याचे आवाहन पाटबंधारे संशोधन व संचालनालय, पुणे अधीक्षक अभियंता श्रीमती. वैशाली नारकर व प्रशिक्षण समन्वयक प्रा. डॉ. गणेश बडे यांनी केले आहे.
सहभागी होण्यासाठीची ऑनलाइन लिंक :-
https://meet.google.com/kfq-test-xyg (Please