गुहा प्रतिनिधी राहुल कोळसे-राहुरी तालुक्यातील गुहा येथील कानिफनाथ देवस्थान जवळील इनामी शेत जमीन गट नंबर २० ते २४ व २६ ते ३१ यातील सर्व अनाधिकृत असलेले बांधकामे त्वरित काढावे. या मागणीसाठी गुहा येथील नाथ भक्तांनी तहसीलदार नामदेव पाटील यांना निवेदन दिले आहे.
तसेच सदरील अतिक्रमण हटवली नाहीतर २४ मार्चपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा देखील नाथ भक्तांच्या वतीने देण्यात आला.यावेळी आबासाहेब कोळसे, किरण कोळसे, मच्छिंद्र कोळसे, ऋषिकेश बांगरे, शशिकेश कोळसे, अँड प्रसाद कोळसे, सचिन कोळसे आदींसह नाथ भक्तांनी निवेदन दिले.
कानिफनाथ देवस्थान गुहा येथील या अगोदरही अनाधिकृत बांधकाम काढण्यासाठी २०१६ पासून मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री, गृहमंत्री, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार यांना अनेक वेळा नाथ भक्तांच्या वतीने येथील अनाधिकृत अतिक्रमणे काढण्यासाठीचे निवेदन देण्यात आले होते. मात्र अध्याप हे अतिक्रमणे काढली नसताना नाथ भक्तांच्या वतीने तहसीलदार नामदेव पाटील यांना निवेदन देऊन अतिक्रमणे काढा अन्यथा २४ मार्च पासून आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला.