भेंडा/नेवासा
नेवासा तालुक्यातील निर्मलग्राम भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत
सरपंचपदी सौ.सुहासिनी किशोर मिसाळ यांची निवड झाली आहे.
भेंडा बुद्रुक ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.रोहिणी नामदेव निकम यांनी राजकीय तडजोडीत ठरल्या प्रमाणे पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या सरपंच पदाची निवड सोमवार दि.१७ मार्च रोजी झाली.अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत सौ.सुहासिनी किशोर मिसाळ व सौ.स्मिता देवेंद्र काळे
यांचे दोन उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. अर्ज मागे घेण्याच्या मुदतीत कोणीच अर्ज मागे न घेतल्याने सरपंच पदाकरिता दोन्ही उमेदवारांचे अर्ज राहिले होते.
मात्र मतदान सभेपूर्वी माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांचे मध्यस्थिने झालेल्या तोडजोडी अंती सौ.मिसाळ यांच्या नंतर सौ.स्मिता काळे यांना सरपंच पद देण्याचे ठरल्याने मतदाना ऐवजी उमेदवार सौ.काळे यांचेसह सर्व १७ सदस्यानी हात वर करून शून्य विरुद्ध सतरा मताने सौ.सुहासिनी मिसाळ यांची सरपंच पदी निवड केली.
ग्रामपंचायत सदस्य वैशाली शिवाजी शिंदे,रोहिणी नामदेव निकम, संगीता गणेश गव्हाणे,संगीता नामदेव शिंदे,स्वाती अशोक वायकर,सौ.उषा लहानू मिसाळ,अण्णासाहेब विठ्ठल गव्हाणे, पंढरीनाथ रामराव फुलारी, मंगल अरुण गोर्डे,स्मिता देवेंद्र काळे, लताबाई यडू सोनवणे,दादासाहेब हौशीराम गजरे, संजय गोरक्षनाथ मिसाळ,माया दत्तू गंगावणे, कादर अब्दुल सय्यद, दिलीप भास्कर गोर्डे उपस्थित होते.
कुकाणा मंडलाधिकारी सौ.तृप्ती साळवे यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले.त्यांना ग्रामविकास अधिकारी रेवनाथ भिसे,ग्राम महसूल अधिकारी बद्रीनाथ कमानदार यांनी सहाय्य केले.