गुहा प्रतिनिधी राहुल कोळसे:अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील गुहा येथील कानिफनाथ महाराजांचा यात्रा उत्सव उद्या बुधवार दिनांक 19 मार्च पासून प्रारंभ होत आहे हा यात्रा उत्सव 19 मार्च व 20 मार्च या दोन दिवसांत पार पडणार आहे. यात्रा उत्सवाची जोरदार तयारी यात्रा उत्सव कमिटी व गुहा ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.
या यात्रा उत्सवासाठी जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात भक्त गुहा गावात येत असतात. यात्रा कमिटीच्या वतीने कानिफनाथ मंदिर व गुहा गावातील मुख्य मंदिरांना तसेच गावातील सर्वच मुख्य रस्त्यांवर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
मंदीर व मंदिर परिसरात फुलांची आकर्षक सजावट केली आहे. यात्रा कमिटीच्या वतीने भावकांना सुसज्ज अशी दर्शन रांग, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त गावात ठेवण्यात आला आहे तसेच महसूल प्रशासनाचे सहकार्य लाभले आहे.
आज मंगळवार १८ मार्च रोजी मानाचा नैवद्य व काठी मिरवणूक, बुधवारी १९ मार्च रोजी सकाळी होमहवन, गंगाजल पूजन व कावड मिरवणूक त्यानंतर दुपारी महाआरती होईल सायंकाळी रात्री ८ ते ११ सांस्कृतिक कार्यक्रम, गुरुवारी २० मार्च रोजी दुपारी ३ ते ४ या वेळेत सराला बेटचे मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांचे प्रवचन व सायंकाळी ५ ते ६ या वेळेत भव्य कुस्ती हंगामा व त्यांनतर सायंकाळी महाआरती होऊन रात्री ८ वाजता नाथभक्त आकाश शिंदे यांचा नाथ गीतांचा कार्यक्रम होणार असून या निमित्ताने हिंदू धर्म रक्षक राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग उपस्थित राहणार आहेत.
सर्व कानिफनाथ भक्तांनी दर्शनाचा व यात्रा कालावधी मधील कार्यक्रमाचा घ्यावा असे आवाहन श्री कान्होबा उर्फ कानिफनाथ देवस्थान विश्वस्त कमिटी, यात्रा कमिटी व गुहा ग्रामस्थांनी केले आहे.