गुहा प्रतिनिधी राहुल कोळसे: अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील गुहा येथे मंगळवार पासून कानिफनाथ महाराजांचा यात्रा उत्सव सुरू आहे. काल बुधवारी यात्रेचा मुख्य दिवस होता यानिमित्ताने जिल्ह्यातील शेकडो भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.
आज गुरुवारी श्रीक्षेत्र सरला बेटचे महंत रामगिरी महाराज यांचे दुपारी ३ ते ४ या वेळेत प्रवचन होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ५ ते ६ वाजता भव्य कुस्त्याचा हगामा होणार आहे .यासाठी महाराष्ट्रातून नामवंत मल्ल दाखल होणार आहे. संध्याकाळी ७:३० वाजता महाआरती होणार आहे.
तर रात्री ८ ते 11 या वेळेत नाथ भक्त आकाश शिंदे यांचा नात गीताचा कार्यक्रम होणार आहे यावेळी राष्ट्रीय श्री राम संघाचे अध्यक्ष सागर भैय्या बेग यांची उपस्थिती राहणार आहे. आजच्या होणाऱ्या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन यात्रा उत्सव समितीच्या अध्यक्ष अतुल दत्तात्रय कोळसे उपाध्यक्ष रवींद्र बाळासाहेब डौले , खजिनदारपदी अनिल सौदागर व सर्व सदस्यांनी केले आहे.