Sunday, April 19, 2026

व्यायाम,आरोग्य आणि चांगले संस्कार ही यशस्वी जीवनाची त्रिसूत्री-पोनि महेश पाटील

Screenshot 2026-01-05 095857
WhatsApp Image 2026-03-19 at 11.11.21 AM
WhatsApp Image 2026-04-17 at 6.17.27 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/सुखदेव फुलारी

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक विकासाबरोबरच विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक, क्रीडा, साहित्य, खेळ यांचाही विकास होणे गरजेचे आहे, त्यासाठी विद्यार्थ्यांनी व्यायाम, आरोग्य आणि चांगले संस्कार या त्रिसूत्रीचा अंगिकार करावा, असे प्रतिपादन नेवासा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी केले.

नेवासा तालुक्यातील भेंडा येथील श्री मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे, जिजामाता शास्त्र व कला महाविद्यालयात दि.२५ फेब्रुवारी रोजी वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त विविध गुणदर्शन कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी उद्घाटक म्हणून श्री.पाटील बोलत होते.
शिक्षण संस्थेचे सहसचिव रवींद्र मोटे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. शिक्षण संस्थेचे विश्वस्त शिवाजी कोलते, वैभव नवले, प्राचार्य डॉ. शिरीष लांडगे, गणेश गव्हाणे, बाळासाहेब डहाळे, अल्ताफ शेख,श्री. मेस्माळे, बाळासाहेब उगलमुगले, नामदेव शिंदे, परीक्षक प्राचार्य ओंकार रसाळ आणि मच्छिंद्र पानकर, उपप्राचार्य डॉ. संभाजी काळे, डॉ. काकासाहेब लांडे, कार्याध्यक्ष डॉ. अजित गेडाम, सहकार्याध्यक्ष, डॉ. अनुराधा बोठे यावेळी उपस्थित होते.

श्री रविंद्र मोटे म्हणाले की, महाविद्यालयीन जीवन हे आनंददायी असून विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत इतर कलागुणांबरोबरच आपले शरीरआणि मन घडवावे.

दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. विद्यार्थ्यांकडून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. यात नृत्य, नाटिका, समूहगान, देशभक्तीपर गीत, शिवकालीन मर्दानी खेळ, टिपरी गीत विनोदी बातमी, तसेच पारंपरिक व आधुनिक कलाविष्कारांचा समावेश होता.

सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. मोहिनी साठे, डॉ. रामदास आरले, राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख डॉ.संजय महेर, शास्त्र शाखाप्रमुख प्रा. केशव चेके, शारीरिक शिक्षण संचालक डॉ. दत्ता वाकचौरे, प्रा. संतोष शेळके श्री रवींद्र पाटील, लक्ष्मण ओहोळे, प्रशांत चव्हाण, अरबाज शेख यांच्यासह सर्व प्राध्यापक शिक्षकेतर सेवक आणि विद्यार्थी कार्यक्रमाला उपस्थित होते.
पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
प्राचार्य डॉ. शिरीष लांडगे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. अशोक सागडे आणि प्रा. सुलतान आतार यांनी
सूत्रसंचालन केले.डॉ. अनुराधा बोठे यांनी आभार मानले.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!