Wednesday, February 25, 2026

पुढील हंगामात १५ लाख टन ऊस गाळपाचं उद्दिष्ट-शंकरराव गडाख

Screenshot 2026-01-05 095857
Screenshot 2026-01-05 095857
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/सुखदेव फुलारी

या हंगामात ११५ दिवसात ९ लाख ३० हजार टन ऊसाचे गाळप केले. एवढेच गाळप करायला पूर्वी जून महिना लागायचा, पण आता कारखान्याच्या मशिनरीचे आधुनिकीकरण केल्याने रोज १० हजार टन गाळप करण्याची क्षमता सिद्ध झाली. त्यामुळे पुढच्या वर्षी पाऊस चांगला झाला तर १५ लाख टनापर्यंत ऊस गाळपाचं उद्दिष्ट राहील असे प्रतिपादन माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी केले.

नेवासा तालुक्यातील सोनई येथील मुळा कारखान्याच्या ४८ व्या गळीत हंगाम सांगता प्रसंगी श्री.गडाखबोलत होते.
श्री.गडाख पुढे म्हणाले की, गेली तीन वर्षे निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका बसला. ऊसाचे क्षेत्र घटले, कारखान्याचे ऊस उत्पादन कमी झाले, त्यामुळे उत्पादन खर्च वाढला, पण या प्रतिकूल परिस्थितीवरही आपण मात केली. इथेनॉल प्रकल्प आणि मशिनरीच्या आधुनिकीकरणासाठी घेतलेल्या कर्जाच्या हप्त्यांची नियमित परतफेड केली. सर्वांना विश्वासात घेऊन खर्चात काटकसर केली आणि हंगामातल्या ऊस गळीताचं काटेकोर नियोजन केलं. रोज साडेबारा हजार टन ऊस तुटेल एवढी यंत्रणा भरली. कारखाना कार्यक्षमतेने चालवला, आणि २५ फेब्रुवारी पर्यंतच सर्व ऊसाचे गाळप पूर्ण केले असे सांगून कारखान्याचे कार्यकारी संचालक शरद बेल्हेकर व त्यांच्या टीममधील अधिकारी तसेच इंजिनिअरिंग, रसायन आणि शेतकी खात्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे त्यांनी जाहीर अभिनंदन केले.

इतर कारखान्यांना ऊस देणाऱ्या शेतकऱ्यांबद्दल ते म्हणाले की, पुढच्या वर्षी ऊस जादा होणार आहे. इतर कारखाने ऊस नेतील का ? काही कारखान्यांनी वेळेवर पैसे दिले नाहीत म्हणून शेतकरी अजून त्यांच्या दारात हेलपाटे मारत आहेत. गेल्या ३०-४० वर्षात आपण परिसरात मोठ्या प्रमाणात योजना राबवल्या, त्यामुळे ऊसाचं क्षेत्र वाढलं. ती बांधीलकी लक्षात घेऊन मुळा कारखान्यालाच ऊस द्यावा आणि जास्तीत जास्त लागवडी वाढवाव्यात. आता कोणत्याही महिन्यात लागवड केली तरी चालेल. कितीही ऊस झाला तरी चालेल. त्याचे वेळेत गळीत करण्यात येईल याची ग्वाही त्यांनी दिली.

सुरुवातीला कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब तुवर, संचालिका सौ.ताराबाई पंडीत व सुखदेव पंडीत, चिफ इंजिनियर दीपक नवले व शेतकी अधिकारी विजय फाटके यांनी सपत्नीक पूजाविधी केल्यावर शंकरराव गडाख यांच्या हस्ते गव्हाणीत ऊसाची शेवटची मोळी टाकून ४८ व्या गळीत हंगामाची सांगता करण्यात आली.

कारखान्याचे कार्यकारी संचालक शरद बेल्हेकर यांनी उपस्थितांचे स्वागत करून गळीत हंगामाबद्दल माहिती दिली.
कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब तुवर तसेच सर्वश्री बाळासाहेब पाटील सोनवणे, आश्रू सानप, जालिंदर पाटील येळवंडे व अरुण सावंत यांनी मनोगत व्यक्त केले.
गळीत हंगाम यशस्वी पार पाडल्याबद्दल कारखान्याचे कार्यकारी संचालक शरद बल्हेकर, वर्क्स मॅनेजर एस.डी.पवार, प्रोडक्शन मॅनेजर एस,डी,गाडे, चिफ इंजिनिअर डी.बी.नवले, चिफ केमिस्ट एस.डी.देशमुख, शेतकी अधिकारी विजय फाटके, उप शेतकी अधिकारी एस.बी.चावरे, डिस्टीलरी मॅनेजर बाळासाहेब दरंदले यांचा सन्मान करण्यात आला.

विक्रमी ऊसतोड वाहतूक करणाऱ्या मुकादम व वाहन मालकांचा सन्मान करण्यात आला. त्यात सर्वश्री दिलीप जगन्नाथ पोटे, दादा काशिनाथ धनगर, शिवाजी लक्ष्मण राठोड, माणिक भगवान हाके, भिमराव मंजू चव्हाण, आदिनाथ सत्यवान दहिफळे, तुकाराम जनार्दन भणगे, रावसाहेब लिंबाजी खाडे, बंडू संपत राठोड, प्रकाश मानसिंग चव्हाण, संजय रावजी भांगरे, गणेश संतराव चव्हाण यांचा समावेश आहे.

कार्यक्रमाला सर्वश्री संजय सुखदान, काकासाहेब गायके, बाबासाहेब मोरे, मच्छिंद्र पाटील कडू, संभाजी धोत्रे, जालिंदर गवळी, स्वप्नील मापारी, असिफ पठाण, राजेंद्र काळे, अनिल शिंदे, फैजाण शेख, नानासाहेब रेपाळे, दिलीपराव लोखंडे, अशोक येळवंडे, सचिन चोरडिया, ह.भ.प. बाळकृष्ण महाराज सुडके, मदन डोळे, महादेव दराडे, दत्तात्रय बेल्हेकर, आप्पासाहेब शिंदे, रामदास चांगुलपाई, प्रदीप चव्हाण, कैलास जाधव, विनायक पुंड, कर्णासाहेब पवार, कर्णासाहेब सुकाळकर, भिकाभाऊ जगताप, गोवर्धन आयनर, दिलीप मोटे, सखाराम कर्डिले, संजय आहेर, तुकाराम शेंडे, एकनाथ धानापुणे, साहेबराव शिंदे, बापूसाहेब शिंदे, त्रिंबक सुकाळकर, राधाकिसन वाघ, अण्णासाहेब केदार, माणिक होंडे, कैलास झगरे, संतोष फिरोदिया, भीमाशंकर वरखडे, तुकाराम भणगे, कल्याणराव उभेदळ, बाबासाहेब घुले, संतोष मस्के, चंद्रकांत मुंगसे, प्रियंक बेल्हेकर, अशोक हारदे, श्रीरंग हारदे, ज्ञानेश्वर बोरुडे, शिवाजी सोनवणे, सिताराम झिने, सोमनाथ कराळे, रमेश कराळे, विजय कुऱ्हे, संभाजी फाटके, इमाम शेख, भाऊसाहेब लांडे, रावसाहेब लांडे, भाऊसाहेब निमसे, सिताराम रोडे, रत्नाकर बोर्डे, कर्णासाहेब जाधव, माणिकराव भागवत, काकासाहेब गायके, मच्छिंद्र पा.कडू, ऋषिकेश काळे, नूरमहम्मद सय्यद, रावसाहेब कांगुणे, पांडुरंग टाके, गणेश मोटे, रामनाथ बडे, पांडुरंग अनारसे, भाऊ दाने, दिलीप जाधव तसेच अधिकारी शंकरराव दरंदले, टी.आर.राऊत, योगेश घावटे, संजय टेमक तसेच मोठ्या प्रमाणावर सभासद, ऊस उत्पादक, मुकादम व कारखान्याचे कर्मचारी उपस्थित होते.

कारखान्याचे व्यवस्थापक व्ही.के.भोर यांनी कार्यक्रमाचा समारोप केला. सचिव रितेश टेमक यांनी सूत्रसंचालन केले.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!