Sunday, April 19, 2026

केवळ पाणी आणि खतांचा अतिवापर म्हणजे जास्त उत्पादन नव्हे

Screenshot 2026-01-05 095857
WhatsApp Image 2026-03-19 at 11.11.21 AM
WhatsApp Image 2026-04-17 at 6.17.27 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी

नेवासा तालुक्यातील महालक्ष्मी हिवरा येथील प्रगतिशील शेतकरी अमोल निर्मळ यांनी पुढाकार घेवून शेतकरी बांधवांसाठी आयोजित करण्यात आलेला ‘शाश्वत ऊस उत्पादन तंत्रज्ञान’ प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला.केवळ पाणी आणि खतांचा अतिवापर म्हणजे जास्त उत्पादन नव्हे असा सूरु प्रशिक्षणात निघाला.

नेवासा तालुक्यातील महालक्ष्मी हिवरा येथे कृषी विज्ञान केंद्र दहिगाव-ने, महाराष्ट्र शासन कृषी विभाग व मुळा सहकारी साखर कारखान्याचे संयुक्त विद्यमाने मंगलवार दि.२४ रोजी आयोजित या प्रशिक्षण कार्यक्रमाला मुळा एज्युकेशन संस्थेचे उपाध्यक्ष उदयन गडाख, नेवासा तालुका कृषी अधिकारी धनंजय हिरवे,दहिगाव-ने कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ.श्यामसुंदर कौशिक, नारायण निबे,मुळा कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब तुवर,संचालक बाळासाहेब बनकर, शंकरराव दरंदले,शेतकी अधिकारी फाटके, संचालक बबनराव दरंदले, रंगाभाऊ जंगले, एकनाथ जगताप, मल्हारी सांगळे आदि मान्यवर प्रमुख पाहुणे उपस्थित होते.

दहिगाव-ने कृषी विज्ञान केंद्राचे
प्रमुख डॉ. श्यामसुंदर कौशिक व विषय विशेषज्ञ नारायण निंबे यांनी
शाश्वत ऊस उत्पादन तंत्रज्ञानावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.ते म्हणाले की,पारंपरिक पद्धतीला फाटा देऊन ‘पट्टा पद्धत’ आणि ‘जोड ओळ’ पद्धतीचा अवलंब करण्याबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. ठिबक सिंचनाचा वापर आणि विद्राव्य खतांच्या अचूक मात्रेमुळे खर्चात कशी बचत होते, उसावरील हुमणी आणि लष्करी अळीच्या प्रतिबंधासाठी जैविक उपाययोजनांवर भर देण्याचे आवाहन करण्यात आले. शाश्वत उत्पादनासाठी माती परीक्षण करूनच खतांचे नियोजन करणे किती गरजेचे आहे.

तसेच याप्रसंगी उपस्थित कृषी क्षेत्रातील मार्गदर्शकांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की, “केवळ पाणी आणि खतांचा अतिवापर म्हणजे जास्त उत्पादन नव्हे, तर तंत्रज्ञानाची जोड देऊन निसर्गाचा समतोल राखणे हीच काळाची गरज आहे.”

घोडेगाव कृषि मंडळ अधिकारी बबन कराड,कृषी पर्यवेक्षक विजय बर्डे, सहाय्य कृषी अधिकारी ऋषी ढोकणे, बाळासाहेब खेडकर, रवींद्र गायके,शैलेश जगताप,शिवाजी सानप, विठ्ठल सानप, बापू शेख, सलीम शेख, बंडू पालवे,आदिनाथ सांगळे, बापू चांगदेव निर्मळ आदी यावेळी उपस्थित होते.
अमोल निर्मळ यांनी आभार मानले.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!