Thursday, November 27, 2025

भारतीय पोस्टल कर्मचारी संघटनेची श्रीरामपूर विभाग कार्यकारणी जाहीर

WhatsApp Image 2025-01-30 at 3.26.50 PM
WhatsApp Image 2025-01-30 at 3.26.50 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

भारतीय पोस्टल कर्मचारी संघटनेची श्रीरामपूर पोस्टल विभागीय संघटनेची स्थापना करून नवीन कार्यकारणी जाहिर करण्यात आली आहे.

भारतीय पोस्टल कर्मचारी संघटनेचे
महाराष्ट्र व गोवा सर्कलचे ऑर्गनायझेशन सेक्रेटरी मदन केंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली श्रीरामपूर डिव्हिजनच्या पोस्टल कर्मचाऱ्यांची बैठक श्रीरामपूर येथे पार पडली.

या बैठकीमध्ये पुढील प्रमाणे श्रीरामपूर पोस्टल विभागाची नवीन कार्यकारणी जाहिर करण्यात आली.
राजेंद्र गायकवाड (अध्यक्ष),अजय साबळे (उपाध्यक्ष),राहुल काळे (सचिव),संदिप अंत्रे (सहाय्यक सचिव) शंकर राख (सहाय्यक सचिव),माधव पेहेरे (खजिनदार)यांची निवड करण्यात आली.

यावेळी बोलताना ऑर्गनायझेशन सेक्रेटरी
मदन केंद्रे म्हणाले की, पोस्ट विभागातील कामकाजात मोठ्या प्रमाणात होत असलेला बदल स्वीकारत सभासदांनी आपल्या ग्राहकांना ग्राहकाभिमुख सेवा देत आपल्या योजना सर्वदूर पोहोचण्यास प्रयत्नशील रहावे, आपल्या प्रलंबित प्रश्न बाबत संघटना सकारात्मक प्रयत्न करत आहे. संघटना ही प्रशासन व सभासद यांच्यातील दुवा म्हणून कार्यरत असते. आपण सर्वांनी संघटित असल्यास सभासदांचे प्रश्न सहज मार्गी लागतात. संघटना ही शक्ती आहे.

भारतीय पोस्टल कर्मचारी संघटनेचे जनरल सेक्रेटरी अनंत पाल (नवी दिल्ली), उपाध्यक्ष एम.पी.सिंग.(नवी दिल्ली), महाराष्ट्र गोवा सर्कल अध्यक्ष मिलिंद ए. कांबळे, सर्कल सेक्रेटरी आर.बी.जमनु, पुणे विभागीय सचिव विजय गायकवाड, महाराष्ट्र आणि गुजरात सर्कल प्रभारी रमेश अंजारीया,महाराष्ट्र गोवा सर्कलचे खजिनदार
प्रदीप सायर यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

 

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!