नेवासा
अखिल भटका जोशी समाज सेवा संघाचे वतीने श्रीक्षेत्र मढी येथे अखिल भटका सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष वामनराव मापरे यांच्या अध्यक्षतेखाली भटक्या जाती-जमातीची ऐतिहासीक परिषदेचे आयोजन करण्यात असल्याची माहिती होत असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष नारायण गदाई यांनी दिली.
भटक्यांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र मढी येथे रविवार दि.२३ मार्च रोजी दुपारी १२ वाजता समाधान गुऱ्हाळकर यांचे प्रमुख उपस्थित किशोर शास्री जोशी ,अड मुकुंद यदमळ,शांतीलाल झुंगे यांचे हस्ते या १९ व्या परिषदेचे उदघाटन होणार आहे.
या परिषेदेमध्ये भटक्या जाती जमातींचे एक संघटन करण्यामागील उद्दिष्ट व भुमिका स्पष्ट करणे, समाजाची राजकिय व शैक्षणिक विषयावर चर्चा करणे,भटक्या जमातिला राजकिय आरक्षण तसेच स्वतंत्र जातनिहाय जनगणना होणे,
उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तिंचा मानपत्र देऊन सत्कार करणे, ऐनवेळेस येणाऱ्या विषयावर चर्चा होणार आहे.
या ऐतिहासिक परिषेदेस जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन
सेवा संघाचे राज्य युवक कार्याध्यक्ष सोपान महापुर,राज्य उपाध्यक्ष अशोक साळवे ,राज्य युवक अध्यक्ष रविंद्र गंगावणे ,नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र जोशी,युवक जिल्हाध्यक्ष पिंटू वाघडकर,युवक जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गजरे,
डॉ.दिलीप यादव,बाबा महाराज मोरे,
शिवाजी पोटे,राज गोत्राळ यांनी केले आहे.