Thursday, February 12, 2026

प्रधानमंत्री आवास योजना फेर सर्व्हेला मुदतवाढ द्या-सरपंच शरद आरगडे

Screenshot 2026-01-05 095857
Screenshot 2026-01-05 095857
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

प्रधानमंत्री आवास योजनेच्या पहिल्या टप्प्यात वंचित राहिलेल्या लाभार्थ्यांना पुन्हा लाभ देण्यासाठी फेर सर्व्हे सुरु आहे, त्याचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी खूप अडचणी येत आहेत. त्यामुळे लाभार्थी वंचित राहू शकतात म्हणून फेरसर्वेसाठी मुदतवाढ देण्याची मागणी नेवासा तालुका लोकसेवक सरपंच संघटनेचे अध्यक्ष शरदराव आरगडे यांनी केली आहे

सदर सर्व्हे बाबत दिलेल्या निवेदनात श्री.आरगडे यांनी म्हटले आहे की, सध्या प्रधानमंत्री आवास योजनेचा फेर सर्व्हे चालू आहे. सदर सर्व्हेची मुदत ३० एप्रिल २०२५ पर्यंत दिली आहे. परंतु नेवासा तालुक्यातील बऱ्याच गावामधील सर्व्हे कमी झाला आहे. लाभार्थ्याला स्वत: सर्व्हे करण्यास अडचणी येत आहे. विभक्त झालेले कुटुंबाना जॉब कार्ड उपलब्ध नाही. काहीचे मोबाईल सर्व्हे ऍपला सपोर्ट करत नाही. तर काहीचे फेस आयडी मॅच होत नाही. त्यामुळे अनेक गरजू लाभार्थी प्रधानमंत्री आवास योजनेपासून वंचित राहू शकतात. म्हणून गरजू लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळणेसाठी प्रधानमंत्री आवास घरकुल योजनाच्या फेर सर्व्हेला मुदतवाढ मिळावी अशी मागणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व नेवासा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!