Wednesday, March 25, 2026

गोंडेगाव येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

Screenshot 2026-01-05 095857
WhatsApp Image 2026-03-19 at 11.11.21 AM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

नेवासा तालुका प्रतिनिधी तालुक्यातील गोंडेगाव येथे दि.३० एप्रिल ते ७ मे या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताह व
श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे.

नेवासा तालुक्यातील गोंडेगाव येथील हनुमान मंदिरामध्ये अक्षय तृतिया मुहूर्तावर बन्सी महाराज तांबे व महंत भास्करगिरीजी महाराज, स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज, सुनिलगिरी महाराज, गणेशानंदगिरी महाराज, माऊली महाराज हजारे, महंत ललितागिरी महाराज (शनेश्वर देवस्थान गोंडेगाव) यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाखाली।होत असलेल्या या हरिनाम सप्ताहाचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे.व्यासपिठ चालक म्हणून रोहिदास महाराज सुसे (गोंडेगाव) हे काम पहाणार आहेत.
अखंड हरिनाम सप्ताहात दररोज
पहाटे ४ ते ६ काकडा भजन,सकाळी ७ ते ११ ज्ञानेश्वरी पारायण, सांय. ५ ते ६ हरिपाठ, रात्री ७ ते ९ किर्तन व त्यानंतर महाप्रसाद आणि रात्री ११ ते १२ जागर असे दैनदिन कार्यक्रम होतील.

तसेच बुधवार दि.३० रोजी रात्री ७ वाजता
राम महाराज शास्त्री(गाजगाव),गुरूवार दि.०१ रोजी भागवताचार्य तुलसीदिदी महाराज (सोनई), शुक्रवार दि.०२ रोजी
विष्णु महाराज अंतरकर (जळगाव),
शनिवार दि.०३ रोजी काशिनाथ महाराज पोमनर (आळंदीकर),रविवार दि.०४ रोजी
दादा महाराज वायसळ (अंमळनेर),
सोमवार दि.०५ रोजी ज्ञानेश्वर महाराज हजारे (पिचडगाव),मंगळवार दि.०६ रोजी
महंत कैलासगिरी महाराज (सावखेडा) यांचे हरी कीर्तने होणार आहेत. तर
बुधवार दि.०७ रोजी सकाळी वाजता गुरुवर्य देविदास महाराज म्हस्के शास्त्री (संत ज्ञानेश्वर संस्थान नेवासा) यांचे काल्याचे किर्तनाने सप्ताहाची सांगता होऊन अमोल गारुडे,संदिप शुळ, अंबादास तुपे,भाऊसाहेब वाघुले, सतिष शुळ (देवा) यांचे कडून उपस्थित भाविकांना महाप्रसाद देण्यात येणार आहे.
या अखंड हरिनाम सप्ताह चा भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन गोंडेगाव ग्रामस्थ व भजनी मंडळाने केले आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!