Sunday, May 24, 2026

पहलगाम घटनेच्या निषेधार्थ कुकाण्यात कडकडीत बंद

WhatsApp Image 2026-05-13 at 7.08.23 PM
WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.32 PM
WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.30 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी

काश्मीर मधील पहलगाम येथील हिंदु पर्यटकांवरील अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कुकाणा ग्रामस्थांच्या वतीने निषेध सभा घेऊन कडकडीत बंद पाळण्यात आला.

२२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम येथील बैसरण घासवाटा परिसरात दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर त्याचा धर्म विचारून निर्दयपणे गोळीबार केला. यात 28 निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला, तर अनेक जण गंभीर जखमी आहेत. ही घटना दहशतवाद्यांनी केलेली क्रूर घटना म्हणावी लागेल. भारताच्या सार्वभौमत्वावर आणि हिंदूंवर तसेच एका मुस्लिम देखील फायरिंग करण्यात आली.

काश्मीर घटनेचा निषेध व्यक्त करत कुकाणा बसस्थानक परिसरात
निषेध करण्यात आला. यावेळी सोमनाथ कचरे, जवाहर भंडारी, इंजिनीअर बाळासाहेब कचरे,राष्ट्रवादीचे अब्दुलभैय्या शेख, काँग्रेसचे अभिजीत लुणिया, अजिंक्य निकम , शिवाजी कावरे यांनी तीव्र शब्दात आपल्या भावना व्यक्त करत या भ्याड हल्लाचा निषेध व्यक्त केला.
तसेच निष्पाप नागरिकांना क्रूरपणे मारणारे आतंकवादी यांच्या वर सरकारकडे कडक कारवाई करण्याची मागणी केली.यावेळी भारत माता की जय, वंदेमातरम च्या घोषणा देण्यात आल्या. पाक विरोधात घोषणा देवून पाकिस्तानचा ध्वज जाळून निषेध व्यक्त केला. मृत पावलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी माजी सरपंच दौलत देशमुख, भाऊसाहेब फोलाणे, श्रीधर कासार, , राजेंद्र बागडे,वसंतराव गरड, सुभाष चौधरी,विष्णू फासे, राजेंद्र वर्मा,सुनिल पंडित, अर्जुन लोंढे, भारत गरड, सतिष कावरे,मुसा इनामदार, बाबासाहेब उंडे,जावेद शेख,वैभव चेमटे,राजेंद्र देडगावकर,राजेंद्र निकम,ईकलाख शहा यांचेसह युवक,व्यापारी,ग्रामस्थ उपस्थित होते. पोलिस उपनिरीक्षक शैलेंद्र ससाणे, पो.कॉ वाल्मिक वाघ यांचे मार्गदर्शनात पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!