Monday, July 20, 2026

भानसहिवरे येथे मुख्य महामार्गावर साकारतेय तिर्थक्षेत्र शिनाई जागृत देवस्थान चे भव्य प्रवेशद्वार  लवकरच महाद्वाराचे भव्य दिव्य लोकार्पण सोहळा

WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
previous arrow
next arrow
Shadow

 

माय महाराष्ट्र न्यूज:अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रसिद्ध व जागृत तिर्थक्षेत्र ‘क’ वर्ग दर्जा प्राप्त देवस्थान म्हणून ज्याची ओळख आहे, असे नेवासा तालुक्यातील भानसहिवरे येथील ५५० वर्षापुर्वीचे तिर्थक्षेत्र शिनाई जागृत देवस्थान ट्रस्ट असून या देवस्थानचे विविध विकास कामे मठाधिपती राष्ट्रसंत सद्गुरू श्री श्री १००८ गुरुवर्य दिगंबर बाबाजी आराध्य यांच्या आशीर्वादाने व उत्तराधिकारी ज्योतिषाचार्य बालब्रह्मचारी महंत आवेराज महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली वेगाने चालू आहेत.

यामध्ये भानसहिवरे नगरीच्या व देवस्थानच्या वैभवात आणखीन एक भर म्हणून छत्रपती संभाजीनगरचे सुप्रसिद्ध उद्योजक सुभाषचंद्र रतनलालजी जैन शेठ यांनी देवस्थान चरणी अर्पण केलेल्या भव्य प्रवेशद्वाराचे (महाद्वार) काम अंतिम टप्प्यात असून लवकरच या प्रवेशद्वाराचा भव्य दिव्य असा लोकार्पण सोहळा जिल्ह्यातील थोर साधु संत व मान्यवर मंडळी व समस्त ग्रामस्त पंचक्रोशीतील भाविक भक्त यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!