Friday, July 24, 2026

माहेश्वरी हरियाली मंचातर्फे ५० बेलवृक्ष रोपांचे वाटप

WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
previous arrow
next arrow
Shadow

श्रीरामपूर/प्रतिनिधी

पर्यावरण संवर्धन, वृक्षसंवर्धन आणि हरित जीवनशैलीचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने श्रीरामपूर येथील माहेश्वरी हरियाली मंच यांच्या वतीने सदस्यांना बेल वृक्षाची सुमारे ५० रोपे भेट स्वरूप देण्यात आली. यावेळी प्रत्येक सदस्याने रोपाचे संगोपन करून पर्यावरण संवर्धनासाठी आपला सहभाग नोंदविण्याचा संकल्प केला.

याप्रसंगी डॉ. अर्चना सोमाणी, डॉ. सपना करवा, डॉ. सुचिता भट्टड, शीतल भुतडा, गीतांजली बंग, दीपा न्याती, संगीता राठी, पूनम सोनी, नेहा बूब, नम्रता मुंदडा, कविता मुंदडा, मंजुषा सोमाणी, प्रेमलता झंवर, पद्मा भुतडा, विमलताई झंवर, संस्कृती झंवर, रमा फोपळे, उज्वला फोपळे, ज्योती बूब, संगीता जाजू, राधिका करवा व अनुराधा धूत आदी सदस्या उपस्थित होत्या.

हरित, स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त परिसर निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमातून समाजाला प्रेरणा मिळत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
हरियाली मंचाच्या अध्यक्षा वर्षा झंवर यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सचिव भारती सोमाणी यांनी कार्यक्रमाचे नियोजन व संयोजन केले. कार्यक्रमासाठी उपाध्यक्षा विजया भुतडा आणि अनिताताई असावा यांनी परिश्रम घेतले.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!