Friday, September 18, 2026

मुळा धरणाचे पाणी आंदोलन प्रकरणी माजी मंत्री शंकरराव गडाखांची जिल्हा न्यायालयात हजेरी

WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
previous arrow
next arrow
Shadow

अहिल्यानगर/प्रतिनिधी

नेवासा तालुक्यातील पिके पाण्या वाचुन करपलेली असतांना
तालुक्यातील शेतकऱ्यांना मुळाचे हक्काचे पाणी देण्या ऐवजी
मुळा धरणाचे पाणी जायकवाडी नेण्याच्या घेतलेलेल्या अन्याकारक व नेवासा तालुक्याची शेती उध्वस्त करणाऱ्या निर्णया विरोधात मुळा धरणाच्या हक्काच्या पाणीप्रश्नी २०२३ मध्ये घोडेगाव ता.नेवासा येथे करण्यात आलेल्या आंदोलनप्रकरणी दाखल फौजदारी गुन्ह्यात बुधवार दि.१६ सप्टेंबर २०२६ रोजी आहिल्यानगर येथील जिल्हा सत्र न्यायालय न्यायमुर्ती श्री. जी.जी.सोनी यांच्या समोर झाली. माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्यासह प्रमुख ९ आंदोलकांनी हजेरी लावली.पुढील सुनावणी दि.३० सप्टेंबर रोजी अहिल्यानगर जिल्हा न्यायालयात होणार आहे.

मुळा धरणाच्या हक्काच्या पाणीप्रश्नी शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी शंकरराव गडाख जनआंदोलन केले होते. या आंदोलनादरम्यान त्यांच्यासह प्रमुख आंदोलकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते.त्यामुळे पुढील सुनावणीपर्यंत त्यांना दिलासा मिळाला असला, तरी खटल्याच्या कामकाजासाठी प्रत्येक तारखेला अहिल्यानगर न्यायालयात उपस्थित राहावे लागणार आहे.
नेवासा तालुक्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाल्याने हक्काचे मुळा धरणाचे पाणी जायकवाडी नेण्याला विरोध करणारे हे आंदोलन मोठ्या प्रमाणावर गाजले होते. शेतकऱ्यांच्या पाणी प्रश्नासाठी गडाख यांनी समर्थक व शेतकऱ्यांसह तीव्र आंदोलन छेडल्याने तालुका व जिल्हा प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली होती. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतल्याने प्रशासनाने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.
या प्रकरणातील न्यायालयीन सुनावणी आता प्रत्यक्ष सुरू झाली असून ३० सप्टेंबर रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीकडे तालुक्यातील शेतकरी कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
नेवासा तालुक्यासह जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती भर पावसाळ्यात निर्माण झालेली असतांना शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्यासाठी लढणाऱ्या शंकरराव गडाख यांना वारंवार कोर्टात चकरा माराव्या लागत आहे सध्याही नेवासा तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!