Sunday, August 31, 2025

माजी आमदार अरुणकाका जगताप यांचे निधन

WhatsApp Image 2025-01-30 at 3.26.50 PM
481894906_9460333617322859_6156576721810500656_n
WhatsApp Image 2025-04-09 at 6.52.29 PM
previous arrow
next arrow
Shadow

अहिल्यानगर

अहिल्यानगरचे माजी नगराध्यक्ष व विधानपरिषदचे माजी आमदार अरुणकाका बलभीम जगताप (वय ६७ वर्षे) यांचे आज २ मे रोजी पुणे येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले.

अरुणकाकांच्या निधनाच्या वृत्ताने अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.अरुणकाका जगताप यांचं पार्थिव राहत्या घरी सारसनगर येथे अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार असून त्यांच्या पार्थिवावर अहिल्यानगर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

मागील काही दिवसांपासून पुणे येथे खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार चालू होते. तज्ज्ञ डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली. नगरपालिकेचे नगराध्यक्ष पदही त्यांनी भूषविले आहे. जिल्हा क्रिकेट संघटनेचे ते अध्यक्ष होते. तसेच गुणे आयुर्वेद शैक्षणिक संस्थेचे ते अध्यक्ष होते. अरुणकाका जगताप हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून सलग दोनवेळा स्थानिक स्वराज्य संस्थेतून विधानपरिषदेवर निवडून गेले होते. काकांच्या निधनाच्या वृत्ताने नगरकरांवर शोककळा पसरली आहे.

अंतिम पार्थिव दर्शन-
आज, शुक्रवार दि. २ मे २०२५ रोजी दुपारी २ वा. निवासस्थानी, भवानीनगर, अहिल्यानगर

अंत्यविधी-
आज, शुक्रवार दि. २ मे २०२५ रोजी दुपारी ४ वा.
अमरधाम, अहिल्यानगर

अंत्यविधी मार्ग-
भवानीनगर, निवासस्थानापासून महात्मा फुले चौक – मार्केटयार्ड- जिल्हा सहकारी बँक – स्वस्तिक चौक- टिळक रोड मार्गे -आयुर्वेद कॉलेज बाबावाडी -नालेगाव -अमरधाम.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!