Friday, February 13, 2026

जिजामाता उच्च माध्यमिक विद्यालयाचा ७२ टक्के निकाल

Screenshot 2026-01-05 095857
Screenshot 2026-01-05 095857
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

नेवासा तालुक्यातील भेंडा येथील श्री.मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेच्या  जिजामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता १२ वी विज्ञान शाखेचा निकाल ७२.६६ टक्के, वाणिज्य शाखेचा निकाल ८१.६९ टक्के तर कला शाखेचा निकाल ३९.०६ टक्के इतका लागला. दिया पोतदार ही विज्ञान शाखेची विद्यार्थिनी  ८६.३३ टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम आली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल दि.५ मे रोजी ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला.
या बोर्डाचे परीक्षेकरिता जिजामाता विद्यालयाचे  बारावी विज्ञान शाखेचे एकूण ४०६ विद्यार्थी परीक्षेस बसले होते त्यापैकी २९५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
वाणिज्य शाखेचे एकूण ७१ विद्यार्थी परीक्षेस बसले होते त्यापैकी ५८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.कला शाखेचे एकूण १२८ विद्यार्थी परीक्षेस बसले होते त्यापैकी ५० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

विद्यालयातील विज्ञान शाखेत प्रथम क्रमांक  कु.दिया शिवप्रसाद पोतदार ५१८ गुण (८६.३३%), द्वितीय क्रमांक  कु.कावेरी सोमनाथ घाडगे
४९९ गुण (८३.१७ %), तृतीय क्रमांक  युवराज शरद गरड ४६७ गुण (७७.८३ %).

वाणिज्य शाखेत प्रथम क्रमांक कु.ईश्वरी संभाजी नजन ४९५ गुण
(८२.५०%), द्वितीय क्रमांक रासकर कु. श्रुती बाळासाहेब अस्वले
४५१ गुण (७५.१७ %), तृतीय क्रमांक कु.वैष्णवी कान्हु गिलबीले ४५० गुण (७५.००%)

कला शाखेत प्रथम क्रमांक कु.साक्षी रेवननाथ गायकवाड ३८३ गुण
(६३.८३ %), द्वितीय क्रमांक कु.रिया संजय बनकर ३७७ गुण (६२.८३ %),
तृतीय क्रमांक कु.अमृता आबासाहेब खंडागळे ३५४ गुण (५९.००%).

शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील, उपाध्यक्ष माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील, विश्वस्त माजी आमदार पांडुरंग अभंग , अड. देसाई देशमुख,  सचिव अनिल शेवाळे , सहसचिव रवींद्र मोटे, प्रशासकीय अधिकारी भारत वाबळे , विद्यालयाच्या प्राचार्य डॉ. जयश्री सरवदे-पवार यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.  

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!