Tuesday, March 31, 2026

आनंदवन सेवाभावी संस्थेच्या पसायदान पुरस्कारांचे उद्या वितरण

Screenshot 2026-01-05 095857
WhatsApp Image 2026-03-19 at 11.11.21 AM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

नेवासा तालुक्यातील सोनई येथील पसायदान आनंदवन सेवाभावी संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त देण्यात येणारे पसायदान पुरस्कारांचे वितरण उद्या सोमवार दि.१२ एप्रिल रोजी सांयकाली ६ वाजता सद्गुरु नारायणगिरी महाराज आश्रमाचे प्रमुख महंत उध्दव महाराज मंडलिक यांच्या हस्ते सोनई येथे होणार असल्याची माहिती संस्थेचे सचिव संजय गर्जे यांनी दिली.

पसायदान आनंदवन सेवाभावी संस्थेच्या वतीने राहुल राजाराम कुसळकर (उद्योजक), दत्ता हापसे (कार्यकर्तृत्व) व ब्रम्हाकुमारी उषादिदी (अध्यात्म) यांना जाहीर करण्यात आले आहेत. जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष स्व. सोपानराव दरंदले यांची स्मृती जागृत रहावी म्हणून सुरु करण्यात आलेला पहिला पत्रकार रत्न पुरस्कार भेंडा येथील जलमित्र सुखदेव फुलारी यांना जाहिर झालेला आहे.पसायदान आनंदवन संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त सोमवार दि. १२ मे रोजी ध्यानमंदीर प्रांगणात सायंकाळी
६ वाजता नेवासा येथील सद्गुरु नारायणगिरी महाराज आश्रमाचे प्रमुख महंत उध्दव महाराज मंडलिक यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे. साहित्यिक एन. बी. धुमाळ व शनैश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष भागवत बानकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. विद्यार्थीदशेत विशेष कार्य केलेल्या कुस्तीपट्टू आर्या गणेश शिंदे, प्रोजेक्ट मॅनेजर अतुल अशोक शिरसाठ, नौदल सैनिक ऋतुजा सचिन कवडे व नेव्ही सैनिक अभिषेक शिवा जंगम यांचा मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात येणार आहे. कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष उदय पालवे व उपाध्यक्ष विनायक दरंदले यांनी केले.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!