Sunday, December 7, 2025

नेवासा तालुक्यातील धार्मिक तिर्थक्षेत्रांना जोडण्यासाठी रस्त्यांच्या कामांना निधी द्या

WhatsApp Image 2025-01-30 at 3.26.50 PM
WhatsApp Image 2025-01-30 at 3.26.50 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

देशाच्या नकाशावर धार्मिक तिर्थक्षेत्र असलेल्या नेवासा नगरीशी भाविकांना जोडण्यासाठी केंद्रिय मार्ग निधी योजनेतंर्गत रस्त्यांच्या कामासाठी निधी उपलब्ध करुन देवून मराठी भाषेचे उगमस्थान असणाऱ्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर मंदिर आणि जगविख्यात श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर सह देवगड तसेच वरखेड येथील महालक्ष्मी देवस्थानचा कायापालट करण्यासाठी या धार्मिक तिर्थक्षेञ असलेल्या पुण्यभूमीला जोडण्यासाठी रस्ता कामासाठी मोठा निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी आमदार विठ्ठलराव लंघे यांनी प्रवरानगर येथे केंद्रिय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.

आमदार विठ्ठलराव लंघे यांनी केंद्रिय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन देत नेवासा धार्मिक नगरीला देशाच्या नकाशावर जोडण्यासाठी विशेष लक्ष घालण्याची मागणी करुन नेवासा तालुका हा धार्मिकदृष्ट्या जगाच्या नकाशावर असल्यामुळे संत ज्ञानेश्वर मंदिर, शनिशिंगणापूर,श्रीक्षेत्र देवगड देवस्थान आणि वरखेड येथील महालक्ष्मी मंदिर येथे दर्शनासाठी भाविक भक्त मोठ्या प्रमाणावर येत असतात.
या तिर्थक्षेत्रांच्या रस्त्यांची दुर्दशा झालेली असून दळणवळणाच्या दृष्टीने भाविकांचे मोठे हाल होत आहेत. त्यामुळे या रस्त्यांना केंद्रीय मार्ग निधी योजने अंतर्गत मंजूरी देवून निधी उपलब्ध करुन द्यावा अशी मागणीही ना.गडकरी यांच्याकडे आमदार लंघे यांनी केली आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!