Thursday, May 21, 2026

तक्षशिला इंग्लिश मीडियम स्कूलचा एस.एस.सी. निकाल १००% – गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

WhatsApp Image 2026-05-13 at 7.08.23 PM
WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.32 PM
WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.30 PM
previous arrow
next arrow
Shadow

देडगाव (ता. नेवासा, जि. नगर) – मनवंतर शिक्षण संस्थेच्या तक्षशिला इंग्लिश मीडियम स्कूलचा इ.१०वी (एस.एस.सी.) मार्च २०२५ चा निकाल १००% लागला असून विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.या यशात कु. मुंगसे सुप्रिया विजय हिने ८०.८०% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक कु. कदम प्रज्ञा आत्माराम (७८.६०%), तृतीय क्रमांक कु. खुशरत धनश्री रामदास (७७.४०%) तर चतुर्थ क्रमांक चि. कदम सार्थक नामदेव (७६.४०%) यांना प्राप्त झाला.

 

या यशाबद्दल संस्थाध्यक्ष प्रा. डॉ. विजय स. कदम, संचालिका सौ. शुभांगी विजय कदम, प्राचार्य विठ्ठल भाऊसाहेब कदम तसेच उपप्राचार्य संदीप आप्पासाहेब खातीक यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. यावेळी त्यांनी शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व पालकांचेही विशेष कौतुक केले.शंभर टक्के निकालाची परंपरा याही वर्षी कायम ठेवत तक्षशिला शाळेने शैक्षणिक गुणवत्तेचा ठसा उमठवला आहे.या यशाकरता विद्यार्थ्यांना अशोक पवार गणेश नांगरे मनीषा अवताडे मयुरी पवार पुनम चिंखडे मोहिनी कर्डिले कल्पना पवार या शिक्षकांनी मार्गदर्शन केले

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!