Thursday, February 12, 2026

ग्रामविस्तार अधिकारी सुभाष पाटील शेळके यांचा सेवापुर्ती सन्मान

Screenshot 2026-01-05 095857
Screenshot 2026-01-05 095857
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

स्वच्छ मन व निस्वार्थ माणूसकीचे धन म्हणून सर्वत्र ओळख असलेले चाळीस वर्ष प्रदीर्घ सेवेनंतर ग्रामविस्तार अधिकारी सुभाष पाटील शेळके यांचा सेवापुर्ती सोहळा साधू संतांच्या व सामाजिक धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या थाटामाटात प्रवरासंगम येथे संपन्न झाला.

गावाला विकासाच्या प्रगतीपथावर नेण्याचे काम जे ग्रामसेवक भाऊसाहेब करत असतात असंच एक नेवासा तालुक्यातील सुभाष शेळके भाऊसाहेब यांनी केलेल्या कामाचा गुणगौरव व सेवा निवृत्ती समारंभ आज प्रवरासंगम येथे संपन्न झाला.
आपल्या सेवेच्या कार्यक्रमांमध्ये त्यांनी पीयजल योजना असेल ग्राम स्वच्छता अभियान असेल तसेच नळ योजना असतील अशा प्रकारच्या अनेक शासकीय उपयोजना गावामध्ये राबवायचं काम ग्रामसेवक भाऊसाहेब करत असतात त्याच पद्धतीने शेळके भाऊ साहेबांनी आपल्या कामाचा ठसा अनेक गावांमध्ये उंमटावला त्यात अनेक गावांना विविध योजनांचा गावाला समावेश करत त्यांनी गावाच्या विकासामध्ये मोठा हातभार लावला आनेक गावा मध्ये विकास गंगा आणण्याचे काम त्यांनी अहोरात्र गेल्या 40 वर्षांमध्ये केले.

या सेवानिवृत्ती कार्यक्रमाप्रसंगी सुभाष शेळके(भाऊसाहेब) बोलताना म्हणाले की माझ्या गेल्या 40 वर्षाच्या सेवेमध्ये मी अनेक गावांना प्रगतीपथावर आणण्याचे काम केले तसेच अनेक गावांना शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्याचे काम काम केले या कामांमध्येच मला सर्व ग्रामस्थ व सरपंच यांनी मोलाची साथ दिली.

गेले 40 वर्षांमध्ये अनेक अनेक गावची सेवा करत असताना आनंद मिळाला परंतु आज ती सेवा करण्याचे भाग्य मला आई-वडिलांच्या तसेच ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे मिळाले कठीण परिस्थितीमधून शिक्षण घेत ग्रामसेवक पदापर्यंत मी माझी कसरत पणाला लावली व चिकाटीने माझ्या गरीबीतील कुटुंबाला आधार देण्याचे काम मी त्या काळामध्ये केले याचा मला आज आनंद होत आहे .

यावेळी ग्रामसेवक शेळके भाऊसाहेब यांनी सर्वच पाहुणे मंडळी तसेच मित्रपरिवार तसेच प्रवरासंगम येथील ग्रामस्थ सरपंच उपसरपंच ग्रामस्थ यांचे मनपूर्वक आभार मानले.

तसेच त्यांच्या सूनबाई दिपाली शेळके यांनी सेवा निवृत्ती समारंभ प्रसंगी शुभेच्छा देत पुढील भावी जेवण निरोगी व त्यांनी आता कुटुंबासाठी भरपूर वेळ द्यावा ही सदिच्छा व्यक्त केली व त्यांना शुभेच्छा दिल्या.

या सेवानिवृत्त कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह.भ.प. रामदास महाराज तरवडीकर ,गटविकास अधिकारी नेवासा संजय लखवाल , अध्यक्ष ग्रामसेवक संघटना विलास काकडे,शेळके सर, भानुदास कावरे, अमोल मते,अशोकराव शेळके, एकनाथ औताडे ,अंबादास कोरडे ,अशोकराव ढगे, दादासाहेब शेळके, विजय घावटे, जगन्नाथ कोरडे, राजेंद्र कदम,पांडव साहेब, वसंत डावखर,उंडे सर, बाळासाहेब पाटील, सखाराम उंडे, सुनील बाकलीवाल, ज्ञानेश्वर घावटे सर, बाळासाहेब कर्जुले, नारायण शेळके, एकनाथ औताडे, अनिल मते, संभाजी गर्जे, संतोष शेळके, दत्तात्रेय पोटे, काकडे भाऊसाहेब, रमेश शेळके, बाळासाहेब कोरडे, रुस्तुम मते,दत्तात्रय कोरडे, केतन काळे,सतीश मोटे, बाळासाहेब आरगडे,आदी मान्यवर उपस्थित राहिले होते. कार्यक्रमासाठी देशमुख सर यांनी सुत्र संचालन केले, विलास काकडे भाऊसाहेब यांनी प्रास्ताविक केले आणि शेळके परिवारने कार्यक्रमाला उपस्थित राहीलेल्या मान्यवरांचे आभार मानले.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!