Monday, March 30, 2026

पोलीस ठाणे नेवासा हद्दीतील अवैध कत्तलखाने केले जमीनदोस्त

Screenshot 2026-01-05 095857
WhatsApp Image 2026-03-19 at 11.11.21 AM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

नेवासा शहरातील भराव गणपती परिसर कसाई मोहल्ला येथे सुरू असलेले अवैध कत्तलखाने तहसील कार्यालय, नगरपंचायत कार्यालय व  नेवासा पोलिस यांचे संयुक्त कारवाईने जमीनदोस्त केले.

याबाबद पोलीस सूत्रांनी दिलेली अधिक माहिती अशी की, दि. ०२ जून रोजी नेवासा शहरातील भराव गणपती परिसर कसाई मोहल्ला येथे अवैध कत्तलखाने असले बाबत नागरीकांचे विविध तक्रारी प्राप्त होत्या. त्याअनुषंगाने नगरपंचायत विभाग नेवासा व पोलीस ठाणे नेवासा यांचे संयुक्त विदयमाने सदर भराव गणपती परिसरात असलेले कसाई मोहल्ला येथील अवैध कत्तलखाने कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने उध्दवस्त करण्यात आले आहे.

सदर कत्तलखाने उध्वस्त केल्याने यापुढे होणारी गोवंशीय हत्या यावर आळा बसणार असुन तरीही कोणी सदर अवैध कत्तलखाने चोरुन लपुन सुरु केल्यास तसेच गोवंशीय अवैध वाहतुक केल्यास त्यांचे वर कठोर प्रचलित कायदयान्वये योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आवाहन तहसिल कार्यालय, पोलीस ठाणे नेवासा, नगरपंचायत विभागा तर्फे  करण्यात येत आहे.

सदर कत्तलखाना उध्वस्त कारवाई तहसीलदार संजय बिराजदार,नेवासा पोलिस ठाणे प्रभारी परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे, नेवासा नगरपंचायत कार्यालयातील श्री. लांडगे यांचे मार्गदर्शनाखाली त्यांचे अधिनस्त अधिकारी व कर्मचारी यांनी केलेली आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!