Thursday, February 12, 2026

तनपुरे कारखाना निवडणुकीत अशोक उर्हे यांच्या विजयानंतर गुहात जल्लोष

Screenshot 2026-01-05 095857
Screenshot 2026-01-05 095857
previous arrow
next arrow
Shadow

गुहा वार्ताहर: राहुल कोळसे: राहुरीच्या डॉ बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत कोल्हार गटातून गुहा येथील अशोक ज्ञानदेव उर्हे यांचा 7329 मतांनी विजयी झाला आहे या विजयाबद्दल गुहा गावात विजय मिरवणूक काढत जल्लोष करण्यात आला.कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांच्या नेतृत्वाखालील जनसेवा मंडळावर ऊस उत्पादक सभासदांनी विश्वास टाकून कारखान्याच्या सत्तेच्या चाव्या तनपुरे गटाकडे दिल्या आहे. या निवडणुकीत तनपुरे गटाने सर्वच २१ जागा जिंकून दणदणीत विजय प्राप्त केला आहे.निवडणुकीच्या निकालात सकाळी मतदान मोजणी सुरू झाल्यापासून जनसेवा मंडळाचे सर्व उमेदवार आघाडीवर होते. अखेर ही विजय घोडदौड चालू ठेवत जनसेवा मंडळाने हा दणदणीत विजय मिळवला.

याप्रसंगी प्रेरणापास संस्थेचे चेअरमन सुरेश वाबळे तनपुरे कारखान्याचे नवनिर्वाचित संचालक अशोक उर्हे,उपसरपंच रविंद्र शिंदे, सिद्धार्थ वाबळे, विष्णूपंत वर्पे, कैलास कोळसे,शरद वाबळे,अक्षय ओहोळ,छबन शिंदे ,लालजी आंबेकर, डॉ विजय वाबळे, अविनाश ओहोळ,अण्णा सौदागर, शेखर कोळसे,नाना चंद्रे , विशाल चंद्रे,चंद्रकांत थोरात , श्रीकृष्ण उर्हे, बाळासाहेब कोळसे,अदिनाथ उर्हे,बाळासाहेब माळवदे, राहुल उर्हे, माजी सरपंच रामनाथ उर्हे ,रवींद्र उर्हे, माझी उपसरपंच पोपट उर्हे ,बंडू वाबळे, नंदकुमार उर्हे,राजेंद्र वर्पे,महेश कोळसे ,मनोज उर्हे,अशोक कोळसे मुकेश चंद्रे , शरद उर्हे, लांबे सर, किरण उर्हे,मच्छिंद्र हरूळे,संकेत चंद्रे , ज्ञानेश्वर उर्हे, शौकत सय्यद,शिवाजी मांजरे , रवींद्र डौले , श्रीराम उर्हे, सोनु माळवदे, योगेश उर्हे निलेश उर्हे,जालिंदर चंद्रे, नमजी उर्हे , संपत उर्हे, बाळासाहेब आंबेकर , अविनाश ओहळ , गौरव डौले , रुपेश सौदागर , पोपट उर्हे , संजय शिंदे आदी यावेळी उपस्थित होते.

सायकांळी आठ वाजता प्रारंभी नगर – मनमाड महामार्ग लगत असलेल्या कमानीतून गुलालाची उधळण करत विजयी मिरवणूक गावातील मुख्य रस्त्यातून प्रेरणा पतसंस्था, बँक ऑफ बडोदा या मार्गाने मारुती मंदिर या ठिकाणापर्यंत ही मिरवणूक वाजत गाजत काढण्यात आली . यावेळी गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतषबाजी करत मोठा जल्लोष करण्यात आला.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!