नेवासा
नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे सेवानिवृत्त अधिकारी श्री. मधुकरराव रायभान फटांगडे यांच्यावर ७५ वा अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त आयोजित अमृत महोत्सव प्रसंगी आप्तेष्टांनी भरभरुन शुभेच्छांचा वर्षाव केला.
रविवार दि.०१ जून रोजी माळीचिंचोरा येथील २४ बाय ७ फुड मॉल सभागृहात जावई श्री.धनंजय म्हस्के,मुलगी सौ. निता धनंजय म्हस्के,मुलगा श्री.रविंद्र फटांगडे,श्री.पंकज फटांगडे, फटांगडे परिवार व मित्रमंडळाने मधुकररावांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन केले होते.
लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक काकासाहेब शिंदे, कामगार संचालक सुखदेव फुलारी, श्री.मारुतरावजी घुले पाटील पतसंस्थेचे चेअरमन बबनराव धस, रामभाऊ पाऊलबुद्धे, भगवानराव गायकवाड, पसायदान उद्योग समूहाचे प्रमुख शिवाजीराव पाठक, पंचायत समितीचे माजी सदस्य अजित मुरकुटे, डिस्टिलरी इंचार्ज महेंद्र पवार, लेबर ऑफिसर बाळासाहेब डोहाळे,लीगल ऑफिसर अड. सुनील शिंदे,डिस्टिलरी केमिस्ट माणिकराव आदिक,आप्पासाहेब वाबळे, अनिल ठोंबरे,अभिजीत देशमुख,रविंद्र निकम, मुक्तेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी कार्यकारी संचालक अण्णासाहेब पटारे, सिद्धिविनायक हॉस्पिटलचे संचालक डॉ.प्रताप पटारे,गंगाधर दरंदले कचरू पटारे, बाळासाहेब पटारे, सुदाम पटारे, दौलतराव शिंदे, अड. निरफळ, आप्पासाहेब शिंदे,अशोक मुळीक, अजय गडाख यांचेसह फटांगरे परिवाराचे नातलग व मधुकरराव फटांगरे यांचे मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी शुभेच्छा देताना काकासाहेब शिंदे व बबनराव धस, अजित मुरकुटे यांनी मधुकरराव यांच्या ज्ञानेश्वर कारखान्यांमधील सेवा व कॉलेज जीवनातील आठवणींना उजाळा दिला.
श्री.धनंजय म्हस्के यांनी प्रास्ताविक केले.
प्रा.अशोक गाडे यांनी सूत्रसंचालन केले.
रवींद्र फटांगडे,पंकज फटांगडे, राहुल फटांगडे,रोहित फटांगडे, श्लोक रवींद्र फटांगडे,आदित्य धनंजय म्हस्के यांनी उपस्थित यांचे स्वागत केले.